अमेरिकेत या किंमतीत विकल्या जात आहेत ‘मेड इन इंडिया’ शेणाच्या गवऱ्या

अमेरिकेतील एका स्टोरमध्ये शेणाच्या गवऱ्या विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लोक या शेणापासून बनलेल्या गवऱ्यांना खाण्याची वस्तू समजू नये यासाठी त्यावर not eatable म्हणजेच खाण्याचा पदार्थ नाही, असे देखील लिहिलेले आहे.

अमेरिकेच्या स्टोरमध्ये मिळत असलेल्या गवऱ्याच्या एका पॉकिटामध्ये 10 गवऱ्या आहेत. त्यावर स्पष्टपणे लिहिण्यात आलेले आहे की, याचा वापर केवळ धार्मिक कामांसाठी करावा. एक पॉकिट गवऱ्या खरेदी करण्यासाठी तुम्हाला जवळपास 215 रुपये द्यावे लागतील.

https://twitter.com/Radhakr16794020/status/1196255754170191873

सोशल मीडियावर या गवऱ्यांच्या पॉकिटाचा फोटो व्हायरल होत असून, युजर्स यावर मजेदार कमेंट्स करत आहेत.

भारतात आजही ग्रामीण भागात गवऱ्यांचा वापर हा इंधन म्हणून केला जातो. याशिवाय पुजा-हवनसाठी देखील याचा वापर करण्यात येतो.

Leave a Comment