या युनिवर्सिटीत गिरवता येणार ‘इमोजी’चे धडे

ब्रिटनमध्ये आता युनिवर्सिटीमधील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात इमोजी देखील शिकवले जाणार आहे. किंग्स कॉलेज, एडिनबर्ग आणि कार्डिफसह सर्वच युनिवर्सिटीत भाषा, मार्केटिंग, मानसशास्त्र आणि राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात इमोजी आणि कार्टुनचा देखील समावेश करण्यात आला आहे.

भावना व्यक्त करण्यासाठी आता जगभरात शब्दांपेक्षा जास्त इमोजीचा वापर करण्यात येतो. तज्ञांचे म्हणणे आहे की, इमोजी आता भविष्याची भाषा बनत आहे. लोक आता शब्दांपेक्षा इमोजीच्या माध्यमातून भावना व्यक्त करत आहेत. लहान मुलांमध्ये याचा वाईट प्रभाव देखील पडत आहे. इमोजीच्या वापरामुळे त्यांची भाषेवरील पकड आणि व्याकरणाचे ज्ञान कमी होत चालले आहे. जगभरात 3178 इमोजी प्रचलित आहेत.

90 कोटी लोक दररोज इमोजीचा वापर करतात. काही दिवसांपुर्वीच झिम्बॉब्बेचे लोकप्रिय नेते रॉबर्ट मुगाबे यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाने भावना व्यक्त करण्यासाठी इमोजी पोस्ट केली होती. राजकीय विषयांपासून ते सामाजिक विषयावर प्रत्येक गोष्टीत इमोजीचा वापर करण्यात येत आहे. 10 वर्षांपुर्वीच चिंता व्यक्त करण्यात आली होती की, इमोजी भाषा संपुष्टात आणेल. 10 वर्षांपुर्वी केवळ 625 इमोजी प्रचलित होत्या. आता याची संख्या 3 हजार झाली आहे.

ब्रिटनच्या ओपन युनिवर्सिटीचे भाषा प्रमुख डॉ. सार्जेंट यांनी सांगितले की, 2015 मध्ये ऑक्सफर्ड डिक्शनरीने वर्ड ऑफ द इयरसाठी कोणत्याही शब्दाची निवड करण्याऐवजी ‘फेस विथ टिअर्स ऑफ जॉय’ इमोजीला डिक्शनरीमध्ये स्थान दिले. 17 जुलेला जागतिक इमोजी डे साजरा केला जात आहे.

रिसर्चनुसार, भारतीय युजर्स 5 इमोजीचा सर्वात जास्त वापर करतात. ते म्हणजे आनंदाचे अश्रू, डोळ्यात दिल, हसणारा चेहरा, नमस्कार आणि दिल या इमोजी आहेत. फेसबुकवर युजर्स 2300 आणि व्हॉटसअपवर 2500 इमोजीचा वापर करतात.

Leave a Comment