रिलायन्स जिओची सेवाही महागणार !


नवी दिल्ली – मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स जिओने आपली सेवा महाग करण्याचा निर्णय घेतला आहे. मोबाईल कॉल आणि डाटाचे दर येत्या काही आठवड्यात वाढविण्याचा निर्णय जिओने घेतला आहे.

पुढील महिन्यात कॉल आणि डाटाचे शुल्क वाढविण्याचा निर्णय भारती एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया कंपनीने जाहीर केल्यानंतर आता जिओनेही दर वाढविण्याचा निर्णय घेतला. शुल्काबाबत आढावा घेण्याकरिता सल्ल्याची प्रक्रिया ट्रायने सुरू केल्याचे रिलायन्स जिओने म्हटले आहे.

इतर दूरसंचार कंपन्याप्रमाणे नियमांचे पालन करण्यासाठी सरकार व ट्रायसोबत काम करत आहोत. दूरसंचार क्षेत्र यातून अधिक बळकट होऊन भारतीय ग्राहकांना याचा फायदा होईल, असा विश्वास जिओने व्यक्त केला. कोणताही विपरित परिणाम डाटा उपभोक्त्याच्या प्रमाणावर होणार नाही, अशा पद्धतीने दर वाढविण्यात येतील, असे कंपनीने म्हटले आहे. तसेच त्यामधून डिजीटलतेचा स्वीकार आणि गुंतवणूक यावर परिणाम होणार नसल्याचेही कंपनीने म्हटले आहे.

Leave a Comment