अभिनंदन ! भारतीय हवाई दलाच्या गेमची ‘बेस्ट गेम 2019’ कॅटेगरीत निवड

गुगलने भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांचे शोर्य दाखवणारा व्हिडीओ गेम टइंडियन एअरफोर्स ए कट अबॉवट ला बेस्ट गेम्स-2019 च्या युजर्स च्वॉइस गेम कॅटेगरीमध्ये निवडले आहे.

हवाई दलाचे माजी प्रमुख बीएस धनोआ यांनी हा व्हिडीओ गेम 31 जुलैला लाँच केला होता. 20 जुलै रोजी या गेमचा टीझर लाँच करण्यात आला होता.   या गेमचे मल्टीप्लेयर मोड देखील लाँच करण्यात आले होते.

हा गेम लाँच करण्याॉ मागचा उद्देश युवकांना भारतीय हवाई दलात सहभाही होण्यासाठी प्रोत्साहित करणे हा होता. भारतीय हवाई दलाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे लोकांना या गेमला वोट करण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून हा गेम 2019 चा ‘युजर्स च्वाईस गेम’  पुरस्कार जिंकू शकेल.

हा गेम आतापर्यंत  10 लाखांपेक्षा अधिक वेळा डाउनलोड करण्यात आलेला आहे. हा गेम खेळणारे युजर्स स्वतः पायलट असल्यासारखे समजतात. या गेममध्ये मिग-21 पासून ते राफेल अशा अनेक लढाऊ विमानांचा समावेश आहे.

Leave a Comment