ताशी 217 किमी वेगाने धावली जेसीबी, गिनीज बुकात नोंद

जेसीबी म्हटले की, आपल्या समोर या गाडीचा पिवळा रंग, रस्त्यावरचा अगदी कमी वेगाने धावणे आणि खोदकाम गोष्टी समोर येतात. रस्त्यावर जेसीबी एवढ्या कमी वेगाने चालते की, त्यामुळे अनेकदा ट्रॅफिक होते.

मात्र एका पठ्ठ्याने ही गाडी एवढ्या वेगाने पळवली की, बघणारा प्रत्येकजण हैराण झाला आहे. गाय मार्टिन नावाच्या व्यक्तीने जेसीबी ट्रॅक्टर ताशी 217 किमी वेगाने चालवत विक्रम रचला आहे. एवढ्या वेगाने जेसीबी ट्रॅक्टर चालवल्याने मार्टिनच्या नावावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सची नोंद झाली आहे.

मार्टिनने सांगितले की, असे काही लोक आहेत, ज्यांना वेगाने धावणारा ट्रॅक्टर तयार करायचा आहे. मी त्यांना सांगितले की, यासाठी ड्रायव्हर हवा असल्यास मला नक्की सांगा. येथूनच सर्व गोष्टींची सुरूवात झाली.

मार्टिनने सांगितले की, एवढ्या वेगात असताना मी गाडीला वळवू शकलो नसतो. कारण याच्या मागील एक्सेल थोडे वेगळे आहेत. त्यामुळे मी केवळ गेअर बदलण्याकडे लक्ष दिले. जोपर्यंत टर्बो चालू होत नाही, अशा गाड्यांचा वेग खूप कमी असतो.

जेसीबी फास्ट्रॅक टू नावाच्या या ट्रॅक्टरला 2 युवा इंजिनिअरच्या टीमने तयार केले आहे. मार्टिन एक बाईक रेसर आहे. मार्टिन आणि त्याच्या असिस्टेंटने जून महिन्यात याची टेस्ट ड्रायव्हिंग केली होती. तेव्हा या ट्रॅक्टरचा वेग ताशी 100 मैल होता. याआधी देखील अनेकदा मार्टिनच्या विक्रमांची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आलेली आहे.

Leave a Comment