अ‍ॅमेझॉनने भारतात लाँच केला ‘इको फ्लेक्स’ स्पीकर

अ‍ॅमेझॉनने भारतात छोटा स्पीकर इको फ्लेक्स लाँच केला आहे. याची किंमत 2999 रुपये आहे. अ‍ॅमेझॉन इंडियाच्या वेबसाईटवरून हा स्पीकर प्री ऑर्डर करता येईल. हा छोटा स्पीकर थेट इलेक्ट्रिक सॉकेटला प्लग करता येतो. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या वायर अथवा चार्जरची गरज नाही.

लिमिटेड ऑफर अंतर्गत इको फ्लेक्स खरेदीवर तुम्हाला 9W चा Wipro एलईडी बल्ब फ्री मिळेल. याची किंमत 2,099 रुपये आहे.

(source)

इको फ्लेक्समध्ये इन बिल्ट स्पीकर देण्यात आलेला आहे. यात यूएसबी ए पोर्ट देण्यात आला असून, त्याच्या मदतीने तुम्ही दुसरे डिव्हाईस चार्ज करू शकता. याची आणखी एक खास गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्याही इलेक्ट्रिक सॉकेटला याला लावले तर याच्यावरती कोणताही स्टँडर्ड चार्जर लावता येईल.

याला सॉकेटला प्लग केल्यावर अलेक्साला सूचना देता येतील. तुम्ही 3.5 एमएम ऑडिओ केबलसोबत देखील दुसरा स्पीकर कनेक्ट करू शकता. इको फ्लेक्स देखील इतर इको स्मार्ट स्पीकरप्रमाणेच काम करते. तुम्ही इको फ्लेक्सला देखील सुचना देऊन गाणी ऐकू शकता.

Leave a Comment