शाओमीचे हे अॅप प्ले स्टोअरमधून गुगलने हटवले


नवी दिल्लीः प्ले स्टोअरवरील काही धोकादायक अॅप्स गुगलने नुकतीच डिलीट केल्यानंतर शाओमीचे क्विक हे अॅपसुद्धा आता प्ले स्टोअरमधुन हटवण्यात आले आहे. गुगलने ही कारवाई युजर्सच्या डेटा सुरक्षेचे कारण देत केली आहे. अॅप हटवण्यापूर्वी ट्विटर आणि रेडिटवर गुगलने क्विक अॅप ब्लॉक केल्याची तक्रार काही युजर्सनी केली होती. क्विक अॅप अपडेट करण्याचा प्रयत्न करताना या अॅपच्या माध्यमातून तुमचा डेटा गोळा करण्यात येत आहे आणि तुम्हाला ट्रॅक करण्यासाठी याचा वापर होत असल्याचा एक मेसेज युजर्सना येत होता. गुगलने हे अॅप क्वीक अॅपचे नवीन अपडेट आल्यानंतर म्हणजेच १४ नोव्हेंबरला ब्लॉक केले आहे.

गुगलने क्विक अॅप ब्लॉक केल्यानंतर एक रिपोर्ट समोर आला आहे. यारिपोर्टनुसार, स्मार्टफोनमधील ५५ सिस्टिम लेव्हल परमिशन शाओमीचे क्विक अॅप अॅक्सेस करत होते. युजर्सच्या डिव्हाइसमध्ये शाओमीचे हे अॅप अनरजिस्टर अॅप इंस्टॉल करत होते. ‘आयएमईआय’, ‘आयएमएसआय’, ‘एसआयएल’नंबर हे अॅप चोरी करत असल्याचे समोर आले आहे. तसेच, याच्या माध्यमातून ऑडिओ, व्हिडिओ कॉल्सही रेकॉर्ड केले जात होते. डेटा थोड्यावेळासाठी सिस्टिममध्ये स्टोअर केल्यानंतर काही वेळानंतर अॅनलिटिकल डॅशबोर्ड तयार करण्यासाठी सर्व्हरवर पाठवण्यात येत असल्यामुळेच शाओमी युजर्सच्या लॉक स्क्रीन आणि दुसऱ्या ब्राउजर्सवर जाहिराती येत होत्या.

Leave a Comment