‘सायना’च्या बायोपिकमध्ये हा अभिनेता साकारणार गोपीचंद यांची व्यक्तिरेखा


सध्या सर्वत्र भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्या बायोपिकची चर्चा आहे. अभिनेत्री परिणीती चोप्रा या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असून सायनाचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्या भूमिकेत कोणता अभिनेता दिसणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले होते. पण आता त्यावरुन पडदा उचलण्यात आला आहे. चित्रपटात पुलेला गोपीचंद यांची व्यक्तिरेख अभिनेता मानव कौल साकारणार आहे.


सायनाच्या जीवनपटात परिणीतीच्या आधी अभिनेत्री श्रद्धा कपूर झळकणार होती. पण, व्यस्त वेळापत्रकामुळे तिने या चित्रपटातून काढता पाय घेतला आणि तिच्या जागी परिणीती चोप्राची वर्णी लागली. त्यानंतर चित्रपटातील दुसरे महत्त्वाचे पात्र असणाऱ्या प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्या भूमिकेसाठी कलाकाराचा शोध सुरू झाला आणि अभिनेता मानव कौल याची निवड करण्यात आली. आपल्या व्यक्तिरेखेचा फर्स्ट लुक नुकताच मानवने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने हे फोटो सोशल मीडियावर सायना नेहवालच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेतील माझा फर्स्ट लुक… असे कॅप्शन देत शेअर केले आहेत.

Leave a Comment