प्रतिक्षा संपली, अखेर तानाजी – द अनसंग वॉरिअरचा ट्रेलर रिलीज


स्वराज्याच्या इतिहासात सूवर्ण अक्षरांनी ‘आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं’ म्हणणारे तानाजी मालुसरेंचे नाव कोरले आहे. तानाजी मालुसरेंनी तहात गेलेला कोंढाणा किल्ला स्वराज्यात परत आणण्याची शपथ घेतली आणि ते शेवटच्या श्वासापर्यंत कोंढाणा मिळवण्यासाठी लढले. स्वराज्यात कोंढाणा आला पण स्वराज्याचा ‘सिंह’ मात्र गेला. महाराजांची कोंढाणा किल्ला परत मिळवण्याची मोहीम फत्तेह झाली, पण राजेही ‘गड आला पण सिंह गेला’ म्हणत हळहळले. ‘तानाजी : द अनसंग वॉरिअर’ चित्रपटाच्या रुपाने स्वराज्यातील अशा या शूर सिंहाची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

नुकताच या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित असा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. अभिनेता अजय देवगन या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. गेल्या वर्षभरापासून तानाजींची भूमिका साकारण्यासाठी अजयने मेहनत घेतली आहे. प्राण झोकून अजयने साकारलेल्या तानाजी मालुसरेंच्या शौर्याची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहेत. १० जानेवारी २०२० रोजी ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात उदयभानच्या भूमिकेत सैफ अली खान आहे. तर अभिनेत्री काजोलनं तानाजी मालुसरेंच्या पत्नी सावित्रीबाईंची भूमिका साकारली आहे.

Leave a Comment