रशियातील पेट्रोल पंपचालकाची ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनोखी ऑफर


पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जगभरात गगनाला भिडलेल्या असतानाच लोक वाढत्या इंधन दरामुळे त्राही त्राही करत आहेत. त्याचवेळी तुम्हाला जर कोणी मोफत पेट्रोलची ऑफर देत असेल तर ती ऑफर लोक खूप आनंदाने स्वीकारतील. सध्या जगभरात रशियातील एका पेट्रोल पंपाची चर्चा होत आहे. लोकांना या ठिकाणी मोफत पेट्रोलची एक अजबगजब ऑफर देण्यात आली आहे. पण त्यामागे एक विचित्र अट ठेवण्यात आली.

ही ऑफर रशियात देण्यात आली असून येथील एका पेट्रोल पंपचालकाने ग्राहकांना मोफत पेट्रोलची ऑफर ठेवली आहे. पण त्यांना यासाठी एक अट घालण्यात आली आहे. पेट्रोल पंपावर ग्राहकांना बिकिनी परिधान करून यायचे आहे. अटीत असे स्पष्ट करण्यात आले आहे की महिला असो वा पुरूष त्यांना बिकिनी परिधान करून यायचे आहे, तरच त्यांना मोफत पेट्रोल देण्यात येईल.

पेट्रोल पंपचालकाच्या या ऑफरनंतर तेथील चित्र पाहणे खूपच मजेशीर आहे. मोफत पेट्रोल मिळविण्यासाठी महिला तर महिला पण पुरूषही रंगबेरंगी बिकिनी परिधान करून येत आहेत. त्यांची लांबच्या लांब रांग लागली आहे. रशियाच्या समारा येथील ओल्वी पेट्रोल पंपाच्या मालकाने विचार केला की ही ऑफर ऐकल्यावर केवळ याचा लाभ घेण्यासाठी महिलाच येतील पण मोफत पेट्रोलसाठी पुरूषांनीही बिकिनी परिधान केल्यावर त्याला विश्वास बसला नाही.

सोशल मीडियात ही ऑफर एवढी लोकप्रिय झाली की त्यानंतर ट्विटरवर बिकिनी ड्रेस ट्रेंड करू लागला. सोशल मीडियावर याचे अनेक फोटो झळकू लागले. लोकांनी त्यावर अनेक मजेदार कमेंट करायला सुरूवात केली. अनेक पुरूष बिकिनी आणि हाय हिल्स घालून पेट्रोल पंपावर आले होते. यावेळी एका पुरूषाने हैराण करणारे वक्तव्य केले. तो म्हणाला, मोफत पेट्रोल मिळत असेल तर तो त्याचे सर्व कपडेही काढायला तयार आहे.

Leave a Comment