आता ही बँक बंद होण्याच्या मार्गावर, तुमचे तर नाही ना खाते त्या बँकेत


नवी दिल्ली : आदित्या बिर्ला आयडिया पेमेंट्स बँक आपला कारभार बंद करणार असून या संदर्भातील वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार आयडिया पेमेंट बँकेला आपला कारभार संपवण्यासाठीची परवानगी रिझर्व्ह बँकेने दिली आहे.

आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँकेने यावर्षी जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच आपला कारभार संपवण्याची घोषणा केली होती. हा निर्णय काही आकस्मिक घटनांमुळे घ्यावा लागत असल्याचे या बँकेने म्हटले होते. आयडिया सेल्युलरने एप्रिल 2016 मध्ये आयडिया मोबाइल कॉमर्स सर्व्हिसेस ही कंपनी पेमेंट बँकेत विलीन केली आणि आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट बँक असे त्याला नाव दिले. ही पेमेंट बँक बंद झाल्यानंतर आता एअरटेल, पेटीएम, जिओ, इंडिया पोस्ट यासारख्या प्रमुख कंपन्यांची पेमेंट बँक सेवा उपलब्ध असेल.

आपल्या ग्राहकांना 20 जुलै 2019 रोजी बँकेने एक संदेश दिला होता. पेमेंट बँकेचे जे ग्राहक आहेत त्यांनी लवकरात लवकर आपला बॅलन्स ट्रान्सफर करावा, असे बँकेने म्हटले होते. 17 महिन्यांच्या आधी आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट बँक एप्रिल 2016 मध्ये सुरू झाली होती. आदित्य बिर्ला नुवो आणि आयडिया सेल्युलर यांचा हा संयुक्त उपक्रम होता. यामध्ये आदित्य बिर्ला नुवोची 51 टक्के भागीदारी आहे. या बँकेला 2015 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेकडून पेमेट बँकेचे लायसन्स मिळाले होते.

Leave a Comment