शिफारस केल्यास सावकरांना दिला जाऊ शकतो ‘भारतरत्न’


नवी दिल्ली – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. भाजपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जाहीरनाम्यात राज्य सरकार सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपूरावा करेल असे आश्वासन दिले होते. केंद्र सरकारने आता यासंदर्भात एक मोठे वक्तव्य केले आहे. केंद्र सरकारने संसदेत सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्यासंदर्भातील एका प्रश्नावर उत्तर दिले आहे.

‘भारतरत्न’ पुरस्कार सावरकरांना देण्यासाठी शिफारस आली आहे का असा प्रश्न संसदेत विचारण्यात आला होता. केंद्र सरकारने त्याला उत्तर देताना सांगितले की, जर अशी शिफारस करण्यात आली तर सावरकरांना ‘भारतरत्न’ दिला जाऊ शकतो. त्याच बरोबर हे देखील केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले की, शिफारशीशिवाय ‘भारतरत्न’ हा दिला जाऊ शकतो.

गेल्या अनेक वर्षापासून सावरकरांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान असलेला ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यावा अशी मागणी केली जात आहे. अनेकांचा सावरकरांना पुरस्कार देण्यावरून विरोध देखील आहे. विशेषत: काँग्रेसचा यासाठी विरोध आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या या उत्तराकडे पाहिजे जात आहे. ‘पद्म’ पुरस्कार आणि ‘भारतरत्न’ हे सन्मान देण्याची प्रक्रिया वेगवेगळी आहे. एका समितीची पद्म पुरस्कार देण्यासाठी नियुक्ती केली जाते. पण अशी कोणतीही समिती ‘भारतरत्न’ हा सन्मान देताना नसते. थेट पंतप्रधान कार्यालयाशी संबंधित हा विषय असतो. ‘भारतरत्न’ हा सन्मान देण्यासाठी कोणाच्या शिफारशीची गरज नसते. या सन्मानाच्या योग्य जी व्यक्ती वाटते त्याला सरकारकडून हा सन्मान दिला जातो.