प्रसुतीनंतर अर्जुनच्या गर्लफ्रेंडचे हॉटफोटो शूट


याचवर्षाच्या जुलै महिन्यात अभिनेता अर्जुन रामपाल याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमिट्रिएड्सने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. त्यानंतर अवघ्या चार महिन्यात वजन कमी करत गॅब्रिएलाने पुन्हा आपली फिगर आकर्षक करत नुकतेच तिने हॉटफोटो शूट केले आहे. त्याचे काही फोटो तिने आपल्या इंस्टाग्राम अकांऊटवरुन शेअर केले आहेत.


सोशल मीडियावर गॅब्रिएला आणि अर्जुन नेहमी अॅक्टिव्ह असतात. त्यात ती पूर्वीपेक्षाही हॉट दिसत असल्याचे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. गॅब्रिएलाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर गॅब्रिएलाचे हॉट फोटो व्हायरल होत आहेत.


अर्जुन रामपालशी गॅब्रिएलाचे असलेले अफेअर प्रचंड चर्चेत राहिले. अद्याप या दोघांनीही लग्न केलेले नाही. पण, लग्नाआधी गॅब्रिएलाने अर्जुनच्या मुलाला जन्म दिला. गॅब्रिएलाने मुलाच्या जन्मानंतर अवघ्या 4 महिन्यातच वजन घटवले आहे.

View this post on Instagram

yung flex #sundayfunday #sundayspecial

A post shared by Gabriella Demetriades (@gabriellademetriades) on


गॅब्रिएला बाळाच्या जन्मानंतरही सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून नेहमी गॅब्रिएला तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.


गॅब्रिएला आणि अर्जुन 2018 पासून एकमेकांना डेट करत आहेत. सध्या गॅब्रिएला भारतातच वास्तव्यास असून लवकरच हे दोघेही लग्न करतील, असेही म्हटले जाते.

View this post on Instagram

Bird or prey ? Channelling my inner @sarahjessicaparker

A post shared by Gabriella Demetriades (@gabriellademetriades) on


2017 मध्ये गॅब्रिएलाला FHM मासिकाकडून जगातील पहिल्या 100 सेक्सी महिलांमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. बाळंतपणानंतरचे अनेक बोल्ड फोटो गॅब्रिएलाने इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत. या सर्व फोटोमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.

Leave a Comment