समोर आला फोर्डच्या ‘मस्टँग मॅक-ई’ इलेक्ट्रिक एसयूव्हीचा लूक

अमेरिकन कार कंपनी फोर्डने आपल्या नवीन कारवरील पडदा हटवला आहे. फोर्डची नवीन कार मस्टँग मॅक-ई ही एक इलेक्ट्रिक्ल कार असणार आहे. कंपनीची ही पहिलीच इलेक्ट्रिक कार आहे. कंपनीने ग्राहकांच्या सुविधेनुसार व गरजेनुसार यात अनेक फीचर्स दिले आहेत. 55 वर्षात प्रथमच मस्टँगमध्ये कंपनी बदल करणार आहे.

2020 च्या अखेरपर्यंत मस्टँग मॅक-ई अमेरिकेत लाँच होईल. यामध्ये स्टँडर्ड बॅटरी 75.7 kWh लिथियम-आयन आणि एक्सटेंड रेंजमध्ये 98.9 kWh लिथियम आयन बॅटरी हे पर्याय मिळतील. याशिवाय बॅटरी वॉटरप्रफु बॅटरी केसमध्ये सुरक्षित असेल. क्रॅश किवा कोणत्याही परिस्थितीत बॅटरी सुरक्षित राहिल.

(Source)

सिंगल चार्जमध्ये ही कार 483 किमी अंतर पार करू शकते. एक्सटेंड रेंज व्हिल ड्राईव्ह कंफर्गेशनमध्ये मस्टँग मॅक-इ 332 हॉर्स पॉवर आणि 565 एनएम टॉर्क जनरेट करते. कंपनी यात दोन स्पेशल परफॉर्मेंस व्हर्जन देत आहे. यातील जीटी व्हर्जन केवळ 4 सेंकदामध्ये ताशी 0 ते 96 किमी अंतर पार करेल. हा वेग पोर्शे मॅकन टर्बो 3 पेक्षाही अधिक आहे. तर जीटी परफॉर्मेंस एडिशन 3 सेंकदापेक्षा कमी वेळेत ताशी 0 ते 96 किमीचा वेग पकडेल.

(Source)

मस्टँग मॅक-ई Whisper, Engage आणि Unbridled या तीन ड्राईव्ह एक्सपिरिएन्स सोबत येईल. या कारमध्ये 15.5 इंचची नेक्स्ट जनरेशन SYNC कम्युनिकेशन आणि इंटरटेंन्मेंट सिस्टम मिळेल. या कारमध्ये 5 जण बसू शकतील एवढी जागा देण्यात आलेली आहे. यामध्ये पॉवरफूल हूड, रिअर हाँच डिझाईन, शानदार हेडलाईट्स देण्यात आलेली आहे.

Leave a Comment