लवकरच सुरू होत आहे गुगलची ‘स्टेडिया गेमिंग’ सेवा

क्लाउड गेमिंगची वाढती लोकप्रियता पाहून आता गुगल देखील या स्पर्धेत सहभागी झाले आहे. कंपनीने ‘स्टेडिया’ नावाने आपली गेमिंग सेवा सुरू केली आहे. या प्लॅटफॉर्मवर यूजर कंसोल क्वॉलिटीचे व्हिडीओ गेम्स खेळण्याचा आनंद वेब ब्राउजर आणि स्मार्टफोनवर घेऊ शकतात. ऑनलाईन गेमिंगचा बाजार जगभरात वेगाने वाढत आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत हा बाजार 15 हजार कोटी डॉलरचा (जवळपास 10 लाख कोटी रुपये) होईल.

स्टेडिया प्लॅटफॉर्मवरील गेम्स सर्वसाधारणपणे ब्लॉकबस्टर चित्रपट आणि रिअल लाइफ वर्क प्रोजेक्टवर आधारित असतील. कोणत्याही डिव्हाईसवर खेळण्याचा पर्याय याला आकर्षक बनवतो.

गुगलने मागील महिन्यात फाउंडर एडिशन किट्सची विक्री केली होती. याची किंमत 129 डॉलर होती. प्रत्येक किटमध्ये एक स्टेडिया कंट्रोलर आणि एक पेंडेटच्या आकाराचे क्रोमकास्ट अल्ट्रावायलेस डिव्हाईस होते. हे डिव्हाईस टिव्ही सेटला कनेक्ट होतात. तर कॉम्प्युटरवर क्रोम ब्राउजरद्वारे याला खेळता येईल.

याशिवाय गुगलच्या पिक्सल स्मार्टफोनवर देखील याचा वापर करता येईल. यासाठी सेंकड जनरेशन अथवा त्याच्या वरील पिक्सल स्मार्टफोनची गरज असेल. स्टेडिया प्रोच्या सब्सक्रिप्शनसाठी अमेरिकेत महिन्याला 10 डॉलर शुल्लक घेतले जाते.

ही सेवा उत्तर अमेरिका आणि यूरोपच्या 14 देशांमध्ये उपलब्ध आहे. गुगलने सध्या स्टेडिया सेवेसाठी 12 गेम्सची नावांची घोषणा केली आहे. स्बस्क्रायबर गुगल डेटा सेंटरवरून होस्ट करण्यात आलेल्या गेम्स देखील खरेदी करू शकतात. काही गेम फ्रीमध्ये उपलब्ध आहेत. स्मार्टफोनवर स्टेडिया सेवा केवळ वायफायवरच चालेल.

Leave a Comment