18 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे ‘रामायण एक्सप्रेस’

भारतीय रेल्वे पुन्हा एकदा रामायण एक्सप्रेस सुरू करणार आहे. आधीप्रमाणेच या एक्सप्रेसद्वारे प्रभू रामांसंबधित पौराणिक स्थळांचे दर्शन घेता येईल. या रेल्वेची सुरूवात 18 नोव्हेंबरपासून होणार आहे. या एक्सप्रेसचे संचालन इंडियन रेल्वे कॅटेरिंग अँन्ड टूरिझ्म कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) करेल.

रामायण एक्सप्रेसचा मार्ग – रामायण एक्सप्रेस 18 नोव्हेंबर 2019 ला इंदौरवरून अयोध्या, सीतामढ़ी, जनकपुर, प्रयागराज, चित्रकूट, नासिक, हम्पी, रामेश्वर, मदुरई असा प्रवास करेल. या प्रवास 14 रात्र आणि 15 दिवसांचा असेल. या प्रवासा दरम्यान भाविकांना प्रभू रामांशी संबंधित सर्व तीर्थ स्थळांचे दर्शन घेता येईल. जसे की राम जन्मभूमी, हनुमान गढी, भारत मंदिर, सीता माता मंदिर, तुलसी मानस मंदिर, संकट मोचन मंदिर, सीतामढी, त्रिवेणी संगम, हनुमान मंदिर, भारद्वाज आश्रम, श्रृंगी ऋषि मंदिर, रामघाट, सती अनुसुइया मंदिर, पंचवटी, अंजनद्री हिल, हनुमान जन्मस्थल, ज्योतिर्लिंग शिव मंदिर या ठिकाणांचा समावेश आहे.

या टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना शुद्ध शाकाहारी जेवण, राहण्यासाठी चांगले ठिकाण, दर्शनीय स्थळांसाठी बस सेवा आणि चांगली सुरक्षा व्यवस्था मिळेल. 18 नोव्हेंबरला सकाळा 6 वाजता इंदौरवरून ही एक्सप्रेस निघाले.

इंदौरवरून सुरू होणाऱ्या या प्रवासासाठी प्रत्येक प्रवाशाला स्टँडर्ड कॅटेगरीसाठी 14,175 रुपये भरावे लागतील. तर कंफर्ट कॅटेगरीसाठी 17,325 रुपये भरावे लागतील. रामायण एक्सप्रेसचे ऑनलाईन तिकिट बूक करण्यासाठी तुम्ही  आयआरसीटीसीची वेबसाईट www.irctctourism.com ला भेट देऊ शकता.

Leave a Comment