हा फळविक्रेता रोज भरतो 200 गरिबांचे पोट

काही लोक चांगले काम करण्यासाठी कधीही पैशांचा विचार करत नसतात.  जेसन पॉल नावाचा फळविक्रेता असेच पुण्याईचे काम करतो. हा फळविक्रेता दररोज 200 गरीब लोकांना जेवण देतो. केरळच्या त्रिशुर जिल्ह्यातील वादूकरा येथे एक बस शेल्टरवर दररोज दुपारी 2 पर्यंत गरीब, बेघर लोकांना जेवण दिले जाते.

द बेटर इंडियानुसार, 37 वर्षी जेसन पॉल सांगतात की, त्यांना हे काम करण्याची प्रेरणा मदर टेरेसा यांच्यापासून मिळाली. आता त्यांची एक टीम दररोज पॉल यांच्याबरोबर मिळून 175 ते 200 लोकांना जेवण देते. त्यांच्या टीमचा उद्देश गरजूंना चांगले जेवण मिळावे हा आहे.

या कार्यात पॉल यांच्याबरोबर त्यांची पत्नी बीनू मारिया, रिक्षाचालक श्रीजीत, निवृत्त बस ड्रायव्हर शाइन जेम्स आणि वर्कशॉप वर्कर व्हीए स्माइल हे सहभागी आहेत. हे सर्वजण मागील 2 वर्षांपासून हे काम करत आहेत.

पॉल हे फळविक्रेता आहेत. तरी देखील ते दर महिन्याला या ट्रस्टसाठी पैसे वाचवतात. ते सुरूवातीला डाळ-भात आणि दलिया खायला घालत असे. मात्र आता ते भात, सांभर, फिशकरी, भाज्या, लोंणचे आणि सलाड देतात. दर महिन्याला त्यांना व्हेजेटिरियन जेवणासाठी 5 हजार आणि नॉन-व्हेजेटिरियन जेवणासाठी 6 हजार रुपये खर्च येतो.

या ग्रुपची मदत करण्यासाठी अनेक जण दान करतात. काही लोक पैसे, तर काही लोक तांदूळ, डाळ, भाज्या देऊन मदत करतात. ते प्लास्टिकचा देखील वापर करत नाहीत. जेवण देखील केळीच्या पानांचा वापर करतात.

Leave a Comment