चक्क 9 वर्षांचा मुलगा घेणार इंजिनिअरिंगची डिग्री

एक सर्वासाधारण व्यक्ती कोणत्याही विषयाची डिग्री वयाच्या 21-22 व्या वर्षी घेत असतो. मात्र नेंदरलँडमधील एक मुलगा चक्क वयाच्या 9व्या वर्षी इंजिअरिंगची डिग्री घेणार आहे.  9 वर्षीय लॉरेंट सिमॉन्स हा इंजिनिअरिंगची पदवी घेणारा सर्वात तरूण व्यक्ती ठरणार आहे. हा छोटा बुद्धिमान मुलगा अर्धा बेल्झियम आणि अर्धा डच आहे. लॉरेंट पुढील महिन्यात आइंडहोवन युनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजीमधून (टीयूई) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची डिग्री मिळवणार आहे.

लॉरेंटचा आयक्यू हा 145 आहे. या असाधारण बुद्धिमतेच्या मुलाने 18 महिन्यातच हायस्कूलचे शिक्षण पुर्ण केले आहे. ग्रॅज्युएशनसाठी युनिवर्सिटीमध्ये दाखला घेणारा तो सर्वात लहान विद्यार्थी आहे. एवढेच नाही तर त्याच्या वडिलांनी सांगितले की, तो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पुढे पीएचडी व मेडिकलमध्ये देखील पदवी घेणार आहे.

लॉरेंटच्या वडिलांनी सांगितले की, जगभरातील अनेक नामांकित युनिवर्सिटी त्याला घेण्यास इच्छुक आहेत. मात्र त्याला आवडेत तो ते करेल. आम्हाला त्याच्या बालपणामध्ये आणि त्याच्या असाधारण क्षमतेत समतोल साधायचा आहे.

त्याच्या कॉलेजमधील शिक्षकांनी सांगितले की, लॉरेंट हा एवढ्या जलद शिकणारा एकमेव विद्यार्थी आहे. तो हुशार तर आहेच, मात्र त्याचबरोबर सहानभूती असणारा मुलगा देखील आहे. लॉरेंटच्या आईने सांगितले की, त्याच्या मध्ये असलेली ही स्पेशल बुद्धिमत्ता सर्वात प्रथम त्याच्या आजोबांनी ओळखली. त्यांना त्याच्यामध्ये काहीतरी वेगळे दिसले.

पुढील महिन्यात पदवी घेतल्यानंतर लाँरेट जगातील सर्वात लहान पदवीधारक असेल. या आधी हा विक्रम युनिवर्सिटी ऑफ अल्बाना येथून पदवी घेणाऱ्या 10 वर्षीय मायकलच्या नावावर होता.

Leave a Comment