वादात सापडली कलाकारांची #पुन्हानिवडणूक मोहिम


सध्या ट्विटरवर मराठी कलाकारांकडून सुरू असलेल्या #पुन्हानिवडणूक या हॅशटॅशवरून वाद सुरू झाला आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी हा हॅशटॅग चालवणारे कलाकार भाजपच्या आयटी सेलशी संबंधित असल्याचा आरोप केला आहे. हे राजकीय कारणांसाठी झाले असेल तर ते दुर्दैवी असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.


महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष शिगेला पोहचलेला असतानाच मराठी कलाकारांकडून #पुन्हानिवडणूक असे ट्विट करण्यात येत आहे. #पुन्हा निवडणूक असे एकच हॅशटॅग वापरुन अभिनेत्री सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, अकुंश चौधरी, सिद्धार्थ जाधव अशा अनेक कलाकारांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ट्विट केले आहे.

झी स्टुडिओच्या आगामी धुरळा या चित्रपटात हे सर्व कलाकार झळकणार असल्यामुळे #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग झी स्टुडिओचा ‘धुरळा’ हा चित्रपटाच्या हे प्रमोशनसाठी असल्याचे स्पष्ट होत आहे. झी स्टुडिओचा हा आगामी चित्रपट राजकीय घडामोडींवर आधारित आहे.

Leave a Comment