बेघरांना निवारा मिळावा यासाठी या संस्थेने पार्किंगला बनवलेे घर

जगभरात असे लाखो बेघर आहेत, जे रात्र झाल्यावर फुटपाथवर झोपतात. रस्त्याच्या कडेला, पुलाखाली, रेल्वे स्टेशन हेच बेघर लोकांसाठी घर असते. वृत्तपत्राची पाने पसरून त्यावर झोपून जातात. याच बेघर लोकांसाठी ऑस्ट्रेलियातील चॅरेटी संघटना बेडडाऊनने एक सुंदर योजना सुरू केली आहे. संघटनेने या बेघर लोकांसाठी राहण्याची सोय म्हणून, ज्या जागा रात्री रिकाम्या असतात अशा ठिकाणी सोय करण्याची योजना बनवली आहे. यामध्ये पार्किंगच्या जागेचा देखील समावेश आहे.

या संघटनेने ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथील एका मोठ्या पार्किंल लॉट्सच्या ऑपरेटरशी चर्चा केली आहे. ते दोन हप्त्यांच्या ट्रायलसाठी तयार झाले. यानंतर संस्थेचे स्वयंसेवकांनी पार्किंगचा कायापालटच करून टाकला. त्यांनी बेघर लोकांना पार्किंगमध्ये रात्री शांतपणे आराम करता येईल व त्यांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही, असे पार्किंगला बनवले.

बेडडाऊनचे संस्थापक Norman McGillivray हे एकदा रात्रीच्या वेळी रिकाम्या पार्किंगमधून परतत होते. त्यावेळी त्यांच्या डोक्यात ही कल्पना आली व त्यांनी बेघर लोकांना या ठिकाणी राहता येईल, या योजनेवर काम करण्यास सुरूवात केली.

View this post on Instagram

It was great to start bringing the Beddown vision to life last night with a group of our awesome volunteers for the Dry Run. Thank you to our awesome group of volunteers who came in late on a Saturday night to help us trial and set-up some beds. Although as expected we had a few challenges to overcome, but it was awesome to start bringing Beddown to life. Thank you also to one of our many awesome collaborators @sunny_street_ for popping in to see what we are looking to achieve, thanks Sonia 🧡 Beddown will provide an immediate response for those who sleep rough to access a safe, secure shelter and access to a comfy bed and a great nights sleep. We will work with our other collaborative partners to provide longer term solutions to transition our guests into accommodation, education and employment opportunities and ultimately put ourselves out of business (this is the vision). Last night was the first important step towards this vision. The great news is we have now been given 8 weeks at the Beddown venue to help our most vulnerable with the view of a longer term engagement. For those of our awesome Beddown community who would like to be involved in volunteering please fill in our volunteer expression of interest form (see link in bio) We believe everyone deserves a bed to sleep in! #homelessness #homeless #advocate #everyonedeservesabed #beds #globalshift #queensland #brisbane #nsw #sydney #victoria #melbourne #southaustralia #adelaide #westernaustralia #perth #northernterritory #darwin #tasmania #australia #nonprofit #gofundme #community #usa #uk #quality #endhomelessness #dryrun

A post shared by beddown (@beddowntonight) on

या संघटनेचा उद्देश बेघर लोकांना सुरक्षित व आरामदायक जागा उपलब्ध करून देणे हे आहे. या बेघर लोकांना डॉक्टर, नर्स, न्हावी यांची देखील सुविधा मिळेल. संघटनेचे म्हणणे आहे की, अनेक बेघर लोक आजारी असतात. त्यामुळे त्यांना डॉक्टरांची गरज असते. एवढेच नाही तर ही संस्था त्यांना नवीन कपडे देखील देणार आहे.

Leave a Comment