कोणतेही लक्षण नसताना या मॉडेलने दिला बाळाला अचानक जन्म

एखादी महिला विना गर्भवतीपणाच्या अनुभवाशिवाय बाळाला जन्म देऊ शकते का ? कदाचित याचे उत्तर नाही असे असेल. मात्र असे घडले आहे. ऑस्ट्रेलियातील एक मॉडेल एरिन लँगमेडला बाळाला जन्म दिल्यावर समजले की, ती गर्भवती होती. लँगमेलाने बाथरूमच्या फरशीवरती बाळाला जन्म दिला आहे.

23 वर्षीय मॉडेल सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते, आश्चर्याची गोष्ट म्हणजे गर्भवती असताना 37 व्या आठवड्यात देखील तिच्या शरीरात कोणतेही बदल झालेले नव्हते.

एरिन लँगमेडने सांगितले की, तिला ना बेबी बंप (पोट वाढणे) होता नाही तिला कसला अशक्तपणा जाणवत होता. तिने सांगितले की, ती कॉन्ट्रासेप्टिव घेत असे. सोशल मीडियावर आपला जोडीदार आणि जन्मलेल्या बाळासोबत तिने फोटो शेअर केला आहे.

लँगमेंडने जी माहिती शेअर केली आहे, त्या सारखी प्रकरणं खूपच दुर्मिळ बघायला मिळतात. तज्ञांनुसार, या प्रेग्नेंसीला स्टेल्थ अथवा क्रिप्टिक प्रेग्नेंसी (गुप्त गर्भधारणा) म्हणतात. म्हणजेच अशी प्रेग्नेंसी जी गुप्तपणे सुरू असते.

एका अभ्यासानुसार, 2500 पैकी एक महिला अशी असती जिला, बाळाला जन्म देईपर्यंत प्रेग्नेंसीचा अनूभव होत नाही. तर 475 पैकी 1 महिला अशी असते जिला 20 हप्त्यांपर्यंत आपण गर्भवती असल्याचे माहित नसते.

असे का होते ? याविषयी डॉक्टर्स रिसर्च करत आहेत. फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या गायनेकोलॉजिस्ट ख्रिस्टिन ग्रेव्हस सांगतात की, अनेक लोक लँगमेंडटे प्रकरण पुर्णपणे समजू शकत नाहीयेत. खासकरून तिच्या बॉडी टाइपबद्दल. यावरून हे समजते की, प्रत्येकाच्या शरीराची रचना एकसारखी नसते.

View this post on Instagram

Hunni <3

A post shared by Erin Langmaid (@erinlangmaid) on

लँगमेंड एक स्वस्थ बाळाला जन्म दिला आहे. बाळाचे वजन 8 पाऊंड आहे. लँगमेंडचा जोडीदार कार्टीने सांगितले की, लँगमेडची किंचाळी ऐकून मी बाथरूमकडे धावलो. जेथे तिने बाळाला जन्म दिला होता. बाळाचा रंग निळा पडत होता, ते बघून आम्ही घाबरलो.

कार्टीला जेव्हा विचारण्यात आले की, त्याची जोडीदार किती महिन्यांची प्रग्नेंट होती. त्यावेळी त्याने उत्तर दिले की, त्यांना तर माहिती देखील नव्हते की, ती प्रेग्नेंट आहे.

Leave a Comment