प्रियकर रॉबर्टशी विवाहबद्ध होणार पॉर्नस्टार मिया खलिफा


मिया खलिफा हे पॉर्न इंडस्ट्रीमधील नावाजलेले नाव असून या इंडस्ट्रीमध्ये मोठे नाव कमावल्यानंतर तिने त्या क्षेत्राला कायमचा राम राम ठोकला. गेल्या कित्येक महिन्यांपासून मिया खलिफा आपल्या प्रियकरासोबत आंनदात आपले जीवन व्यतीत करत आहे. मिया खलिफाने आता विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला आहे. मियाने या वर्षी मार्चमध्ये तिचा प्रियकर रॉबर्ट सँडबर्गशी साखरपुडा केला होता. त्यानंतर या दोघांनी 2021 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण आता असे काही घडले आहे की, मिया येत्या सहा महिन्यात लग्न करणार आहे. येत्या 6 महिन्यांत मिया आणि रॉबर्टच्या लग्नाचा बार उडणार आहे.


लग्न प्री-पोन्‍ड झाल्याने मिया गरोदर आहे का? असा अनेकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली होती. मियाने त्यावर आपण गरोदर नसल्याचे म्हटले आहे. पॉर्न इंडस्ट्रीला राम राम केल्यानंतर आपण रॉबर्ट सँडबर्गबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा मिया खलिफाने इंस्टाग्रामवर केला होता. आता आपला लग्नाचा निर्णय मियाने चाह्त्यांसोबत शेअर केला आहे. एका ट्विटद्वारे मियाने सांगितले आहे की, पूर्वीच्या योजनेनुसार आपले लग्न 2021 मध्ये नाही, तर पुढच्या वर्षाच्या उन्हाळ्यात होणार आहे. यासह मियाच्या घरी लग्नाची तयारी जोरदार सुरु असल्याची माहिती तिच्या ट्विटद्वारे मिळत आहे.


आपल्या प्रियकराच्या करियरसोबत आपण आपले आयुष्य जोडण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे आपण लवकर लग्न करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मियाने दिली आहे. मियाचे हे दुसरे लग्न असेल. यापूर्वी तिने 2011 मध्ये तिच्या एका शाळेतील मित्राशी विवाह केला होता. मियाचे पहिले लग्न फक्त 5 वर्षे टिकले. घटस्फोट झाल्यावर मियाने काही अडल्ट चित्रपटांमध्ये काम केले.

Leave a Comment