बाब्बो ! या पठ्ठ्याने पाळला आहे 18 फुटी अजगर

प्रत्येक व्यक्तीला कोणता तरी प्राणी आवडत असतो. कोणाला कुत्रा तर कोणाला मांजर आवडत असते. तर काही लोक गाय, म्हैस, बकरी, कौंबडा असे प्राणी देखील पाळतात. मात्र आज आम्ही तुम्हाला ज्या व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, त्याने जगातील सर्वात खतरनाक जीव पाळला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्या दोन लहानमुलांसोबतच या जीवाला हा व्यक्ती ठेवतो.

(Source)

इंग्लंडमधील ट्वेक्सीबरी शहरात राहणाऱ्या 31 वर्षीय मार्क्स हॉब्सने चक्क 18 फूट लांब अजगर पाळला आहे. या अजगरला हॉब्स हेक्सी नावाने हाक मारतो. एवढेच नाही तर हा अजगर हॉब्सबरोबरच रूममध्ये राहतो.

(Source)

हेक्सी नावाचा हा अजगर मादा साप आहे, जी हरिण, ससा आणि डुक्कर खाते. या अजगरासाठी सर्व खाण्याच्या वस्तू स्थानिक शेतकरी पुरवतात. तर या अजगराचा मल एका मोठ्या बॅगमध्ये जमा केला जातो.

(Source)

आयटी कंपनीत काम करणाऱ्या मार्क्स हॉब्सला या अजगराला पाळण्यासाठी हजारो डॉलर खर्च करावे लागतात. हा अजगर एवढा मोठा झाला आहे की, एका क्षणात एखाद्या व्यक्तीला खावू शकतो.

(Source)

हॉब्सने 8 वर्षांपुर्वी या अजगराला खरेदी केले होते. तेव्हा याची साइज 8 इंज होती. मागील 8 वर्षात याची लांबी 18 फूट झाली आहे  आणि वजन देखील 100 किलो झाले आहे.

Leave a Comment