मोटोरोलाचा बहुप्रतिक्षित फोल्डेबल स्मार्टफोन लाँच

स्मार्टफोन कंपनी मोटोरोलाने आपला फोल्डेबल स्मार्टफोन मोटो रेझर Motorola Razr (2019)  लाँच केला आहे. हा फर्स्ट जनरेशन मोटो रेझरच्या तुलनेत एकदम वेगळा आहे. कंपनीने यात शानदार फोल्डेबल डिस्प्ले डिझाईन दिले आहे.

दुसऱ्या कंपनीच्या फोल्डेबल स्मार्टफोन पेक्षा हा फोन वेगळा असून, हा फोन वर्टिकली म्हणजे वरच्या दिशेन फोल्ड होतो. मोटो रेझर 2019 फोल्डेबल स्मार्टफोनची अमेरिकेतील किंमत 1499 डॉलर (जवळपास 1,07,000 रुपये) आहे. 9 जानेवारी 2020 पासून अमेरिकेत या फोनची विक्री सुरू होईल.

(Source)

हा स्मार्टफोन दोन स्क्रीनसोबत येतो. फोनच्या आतील बाजूला एक डिस्प्ले आहे तर बाहेरील बाजूस एक डिस्प्ले आहे. आतील स्क्रीनची साइज 6.2 इंच असून, यात फ्लेक्सिबल OLED इंटरनल डिस्प्ले 21:9 सिनेमाव्हिजन आस्पेक्ट रेशिओ आहे. तर फोल्डेबल फोनच्या बाहेरील बाजूस 2.7 इंचचा डिस्प्ले आहे. हा बाहेरील डिस्प्ले युजर्सला नॉटिफिकेशनची माहिती देईल. फोनचे फिंगरप्रिंट सेंसर बाहेरील पॅनेललाच देण्यात आले आहे.

(Source)

कॅमेऱ्याविषयी सांगायचे तर यात 2 कॅमेरे देण्यात आलेले आहेत. यामध्ये नाइट व्हिजन मोडसोबत 16 मेगापिक्सल फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आलेला आहे. तर 5 मेगापिक्सलचा इंटर्नल कॅमेरा देण्यात आलेला आहे.

(Source)

फोन अँड्राईड 9 पायवर काम करतो. यामध्ये केवळ ई-सिमकार्ड सपोर्ट करते. फोनला 6जीबी रॅम+128जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आलेला आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट प्रोसेसर मिळेल.

फोनमध्ये 15 वॉट फास्ट चार्जर सपोर्टसोबत 2510एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. बॅटरी कमी असली तरी सिंगल चार्जमध्ये संपुर्ण दिवस टिकू शकते. याशिवाय कनेक्टिव्हिटीसाठी यात एनएफसी सपोर्ट, ब्लूटूथ 5.0, वायफाय 802.11, 4जी एलटीई आणि जीपीएस सारखे फीचर्स मिळतील.

 

Leave a Comment