इंस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने अँड्राईड युजर्ससाठी नवीन बीटा व्हर्जन आणले आहे. या अपडेटमध्ये व्हॉट्सअॅपच्या फुटरला फेसबुक (From FACEBOOK) असे लिहून येत आहे. यासोबतच या अपडेटमध्ये डार्क थीम देखील मिळण्याची शक्यता आहे. नवीन अपडेटमध्ये व्हॉट्सअॅपमध्ये रिडिझाईन फेसबुक लोगो दिसेल.
व्हॉट्सअॅपच्या नवीन अपडेटमध्ये फूटरला दिसणार फेसबुकचा लोगो
फेसबुक फुटर व्हॉट्सअॅपच्या वेलकम स्क्रीनवर देखील दिसेल. याशिवाय सेटिंग्समध्ये देखील हा लोगो दिसेल. फेसबुकने मागील महिन्यातच नवीन लोगो आणला होता. आपल्या सर्व प्रोडक्ट्सवर ब्रँडिंग म्हणून वापरण्यासाठी कंपनीने हा लोगो आणला होता.
लेटेस्ट बीटा व्हर्जनमध्ये अँड्राईडनंतर आयफोनमध्ये देखील डार्क मोड फीचर मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये soon हा हॅशटॅग वापरण्यात आला आहे. व्हॉट्सअॅपच्या आयफोन प्लॅटफॉर्मवर डार्क थीमचे दोन व्हर्जन दिसले आहेत. यामध्ये काळ्या रंगाचे दोन शेड्स आहेत. मात्र अद्याप डार्क थीमबद्दल व्हॉट्सअॅपने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
