नव्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत आली आमिर खानची लेक


आता बॉलिवूडमध्ये सैफ अली खान, श्रीदेवी या लोकप्रिय कलाकारांच्या मुलांनी पदार्पण करण्यास सुरुवात केली आहे. यात सारा अली खान, जान्हवी कपूर, आलिया भट, वरुण धवन हे काही स्टार कीड लोकप्रिय झाले आहेत. पण असे काही स्टार कीड आहेत ज्यांचा बॉलीवूडशी काही संबंध नसताना देखील त्यांची लोकप्रियता कमालीची आहे.


यामध्ये करीना कपूरचा मुलगा तैमुर, शाहरुख खानचा मुलगा अबराम आणि आमिर खानची मुलगी इरा खान यांची प्रचंड लोकप्रियता आहे. अनेक वेळा आपल्या पर्सनल लाइफ आणि फोटोशूटमुळे आमिर खानची लेक इरा चर्चेत येत असते. ती यावेळीदेखील तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.


सोशल मीडियावर इरा मोठ्या प्रमाणात सक्रिय असून ती इन्स्टावर तिचे नवनवीन फोटो कायम शेअर करत असते. अनेक वेळा तिचे फोटो पाहून ती कलाविश्वामध्ये पदार्पण करणार का असा प्रश्नही नेटकऱ्यांमध्ये उपस्थित होतो. पण निर्मिती क्षेत्रात इराला करीअर बनवयाचे तिने ठरवले आहे. ती यासाठी तयारीही करत आहे. ती या साऱ्यातून वेळ काढून तिच्या लूककडेही तेवढेच लक्ष देत असल्यामुळेच तिने केलेल्या नव्या फोटोशूटची सध्या चर्चा आहे.


तिने केलेल्या फोटोशूटमध्ये ती प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. निसर्गाच्या सानिध्यात तिने फोटोशूट केले आहे. दरम्यान, आमिर खान प्रोडक्शनच्या वेगवेगळ्या शोज आणि इतर कामांमध्ये इरा कायम व्यस्त व्यस्त असते.


वडिलांच्या देखरेखीखाली सध्या तिचे प्रशिक्षण सुरू आहे. आमिर खानची इरा लेक असूनदेखील ती कधीही याचा देखावा करत नाही. ती कायमच तिच्या सहकाऱ्यांसोबत प्रेमाने वागते. त्याचबरोबर तिच्यात जराही अहंकार नसल्याचे तिच्या जवळच्या व्यक्तींनी सांगितले आहे.

Leave a Comment