5.4 अब्ज फेक अकाउंटवर फेसबुकची कुऱ्हाड


सोशल मीडियात अग्रेसर असलेल्या फेसबुकने आपल्या प्लॅटफॉर्मवरुन तब्बल 5.4 अब्ज अकाउंटवर कारवाई करत ही अकाऊंट डिलीट केली आहेत. फेसबुक जी अकाऊंट डिलीट केली ती फेक असल्याचे सांगितले आहे. फेसबुकने तब्बल 5.4 अब्ज फेक अकाउंट डिलीट केले आहेत. कंपनीने हे अकाउंट या वर्षी एप्रिल ते सप्टेंबर महिन्यादरम्यान डिलीट केले आहेत. फेसबुकने त्याचबरोबर बाल शोषण आणि आत्महत्येसंदर्भात जवळपास एक कोटी पोस्ट देखील डिलीट केल्या आहेत. ही आकडेवारी वेबसाइटच्या लेटेस्ट कंटेंट मॉडरेशन रिपोर्टमध्ये समोर आली आहे.

फेसबुकने गेल्या वर्षीही याच कालावधीत फेक अकाउंट डिलीट केली होती. त्या तुलनेने यावर्षी हटवण्यात आलेल्या फेक अकाउंटच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे. त्याचबरोबर फेसबुकने आपल्या प्लॅटफॉर्मवरुन बाल शोषण संबंधित जवळपास 1.16 कोटी पोस्ट डिलीट केल्या आहेत. तसेच 7.5 लाख पोस्ट इन्स्टाग्रामवरुनही फेसबुक टीमने हटवल्या आहेत. आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या पोस्ट हटवण्यात आल्याचेही फेसबुकने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. हटवण्यात आलेल्या आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या पोस्टबाबात पहिल्यांदाच आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. अशाप्रकारच्या २५ लाख पोस्ट्स डिलीट करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर ड्रग सेल्सशी संबंधित 44 लाख पोस्टही फेसबुकने डिलीट केल्या आहेत.

फेसबुकचा वापरणाऱ्यांच्या संख्येत जसजशी वाढ होत आहे, तसाच त्याचा गैरवापर करणाऱ्यांच्या संख्येतही सातत्याने वाढ होत आहे. फेसबुककडून याला आळा घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे अकाउंट त्यानुसारच डिलीट करण्यात आले आहेत. फेसबुकवर जर कोणी फेक अकाउंटचा वापर करत असेल तर आधीच्या तुलनेने ते अकाउंट आता त्वरीत ट्रॅक करता येतात, आणि लगेच डिलीट केले जातात असे फेसबुककडून सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर फेसबुककडून कंटेंटच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अकाउंटवर कारवाई करण्यात आली आहे.

Leave a Comment