असावा पौष्टिक सकाळचा नाश्ता


आपण सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम चहाचा कप हातात धरतो. ही सवय आरोग्यास हानिकारक असल्याचे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर जर काही ठराविक पदार्थ खाऊन आपण आपल्या दिवसाची सुरुवात केली तर ते आपल्या आरोग्यास निश्चितच फायद्याचे ठरेल.

ओटमील किंवा ओट्स : ओट्स मध्ये फायबर ची मात्रा भरपूर प्रमाणात असल्याने पचन क्रिया चांगली राहते.

दलिया : दलिया मध्ये प्रथिने, लोह आणि जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे सकाळच्या न्याहारी करिता दलिया हा एक उत्तम पर्याय आहे.

अंडी : सकाळी न्याहारीमध्ये अंडी घेतल्याने पोट पुष्कळ वेळ भरलेले राहून वारंवार भूक लागत नाही. जे वजन घटविण्याचा प्रयत्न करीत असतील त्यांनी सकाळच्या न्याहारीकारिता अंडी घ्यावीत.

कलिंगड : कलिंगड खाल्ल्यामुळे शरीराला त्याद्वारे fluids मिळतात.त्याचबरोबर कलिंगडामध्ये असणारे लायकोपीन डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम समजले जाते.

होल ग्रेन ब्रेड : यीस्ट शिवाय बनविलेला होल ग्रेन ब्रेड ही सकाळच्या न्याहारीसाठी उत्तम. त्यामध्ये असलेली कर्बोदके व धान्यांमध्ये असलेली इतर पोषक तत्वे आपल्याला फायदेकारक आहेत.

सुकामेवा : सुकामेवा आपल्या शरीरासाठी उत्तम पण या मध्ये कॅलरीज चे प्रमाण अधिक असल्याने याचे सेवन माफक मात्रेमधेच करावे.

मध : मध आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेकारक आहे. सकाळी उठ्ल्याबरोबर गरम पाण्यातून लिंबाचा रस आणि मध घेतल्यास त्याचा फायदा होतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment