इम्तियाज अली बनवणार ‘मधुबाला’च्या आयुष्यावर आधारित चित्रपट


काही दिवसांपासून कलाविश्वात बॉलिवूडची आयकॉनिक अभिनेत्री मधुबाला यांच्यावर बायोपिक तयार होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यांनी आपल्या अभिनयाने आणि गोड हास्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता त्यांच्या याच अभिनयाची जादु बायोपिकच्या निमित्ताने पडद्यावर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. मधुबाला यांच्या जीवनावर आधारित बायोपिक सुप्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली हे तयार करत असल्याचे वृत्त समोर आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मधुबाला यांच्या जीवनावर आधारित बायोपिक इम्तियाज अली हे तयार करणार आहेत. मुमताज जहान बेगम देहल्वी असे मधुबाला यांचे खरे नाव असून त्यांनी आपल्या अभिनयाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीवर अमिट असा ठसा उमटवला होता.

त्यांचा बायोपिक बनवण्याचे सर्व हक्क इम्तियाज अलीने मिळवले असून त्यांच्या जीवनावर बायोपिक किंवा वेब सीरिज बनवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. याबाबत इम्तियाज अलीने सांगितले की, आपल्याकडे मधुबाला यांच्यावर आधारित भरपूर माहिती उपलब्ध आहे. त्यांच्या बालकलाकारापासून ते अवघ्या १४ व्या वर्षी ‘नीलकमल’मधील राजकपूरची अभिनेत्री साकारण्यापर्यंतच्या बऱ्याच गोष्टी अविस्मरणीय आहेत. अद्याप मधुबाला यांच्या बायोपिकची अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, इम्तियाज यांनी याबाबत फक्त माहिती दिली आहे. पण रुपेरी पडद्यावर त्यांची भूमिका साकारण्यासाठी कोणती अभिनेत्री योग्य ठरेल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment