गुगलवर लाखो नागरिकांचा हेल्थ डेटा चोरी केल्याचा आरोप

गुगलवर अमेरिकेच्या लाखो नागरिकांचा हेल्थ डेटा चोरून जमा करण्याचा आरोप करण्यात आला आहे. गुगलवर मागील 1 वर्षात 21 राज्यांमधील लाखो नागरिकांचा डेटा त्यांची परवानगी न घेता वापर करण्याचा आरोप देखील करण्यात आलेला आहे. गुगलने आरोग्य सेवा देणारी कंपनी असेंशनसोबत करार केला आहे.

ही कंपनी अमेरिकेतील 20 राज्यांमधील जवळ 150 हॉस्पिटलचे संचलन करते. कंपनीद्वारे संचलित हॉस्पिलमध्ये उपचार करणाऱ्या रुग्णांचा डेटा, खाजगी माहिती त्यांच्या माहितीशिवाय गुगल क्लाउडवर अपलोड करण्यात आली आहे.

गुगल आणि असेंशनने मिळून आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रोजेक्ट नायटेंगेल सुरू केले होते. दोन्ही कंपनीनी मागील 1 वर्षात रुग्णांच्या आरोग्य डेटाचे विश्लेषण केले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, या डेटाचा वापर रुग्णांना चांगल्या आरोग्य सेवा देण्यासाठी करण्यात येतो.

असेंशनतर्फे रुग्णांची सर्व खाजगी माहिती, आजार आणि औषध याचा डेटा जमा केला आहे. अमेरिकेत आरोग्य सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना रुग्णांचा डेटा देण्यास परवानगी आहे. मात्र यामुळे खाजगी माहितीचा वापर करण्यात येत असल्याची भिती लोकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment