याला म्हणतात क्रिएटिव्हिटी, हे लग्नाचे कार्ड एकदा बघाच

लग्न म्हटले की सजावट, कपडे, हॉल, जेवण अशा एकना अनेक गोष्टी असतात. मात्र सर्वात खास असते ते म्हणचे लग्नाचे कार्ड अर्थात पत्रिका. प्रत्येकाला आपल्या लग्नाचे कार्ड असे खास आणि हटके असावे असे वाटत असते. त्यासाठी लोक अनेक नवनवीन गोष्टी करतात. असेच एक लग्नाचे कार्ड सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे कार्ड बघणारा प्रत्येक जण जोरजोरात हसत आहे आणि कार्ड बनविणाऱ्याच्या क्रिएटिव्हीटीचे कौतूक करत आहे.

View this post on Instagram

An honest #wedding card. Please #RSVP

A post shared by Akshar Pathak (@aksharpathak) on

एका युजरने या कार्डचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कार्डमध्ये लिहिण्यात आले आहे की, जर दीपिका-रणवीर 6 फंकश्नस करू शकतात. प्रियंका-निक 9 फंक्शन्स करू शकतात. तर आम्ही देखील कमीत कमी दोन-तीन फंक्शन्स तर नक्कीच करू शकतो.

लग्नाच्या खर्चाविषयी कार्डमध्ये लिहिले आहे की, आम्ही किती खर्च केले आहे, हे तुम्ही कार्डाच्या वायफळ खर्चावरूनच समजू शकता. अंबानी पेक्षा कमी थोडी आहोत आम्ही.

या कार्डमध्ये लिहिलेली स्क्रिप्ट जबरदस्त आहे. कार्डमध्ये आहेराविषयी लिहिले आहे की, नो गिफ्ट्स प्लीज, फक्च कॅश द्या. तुमचा 18 ज्यूसर मिक्सर ग्राइंडरचे आम्ही काय करणार ? पत्रिकेच्या शेवटी हॉलचा पत्ता देखील अगदी मजेशीरपणे सांगण्यात आला आहे.

या कार्डाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, कार्ड बनविणाऱ्याच्या क्रिएटिव्हीटीचे लोक कौतूक करत आहे.

Leave a Comment