अरेच्चा ! चक्क माकडाने केली मोबाईलद्वारे ऑनलाईन शॉपिंग

स्मार्टफोन्स आणि ऑनलाईन शॉपिंगचे वेड केवळ मनुष्यालाच आहे, असे आपण आजपर्यंत समजत होतो. मात्र आता या यादीत माकडाचे नाव देखील जोडले गेले आहे. चीनमध्ये चक्क माकडाने मोबाईलद्वारे शॉपिंग केली आहे.

पुर्व चीनमध्ये चांगझू येथील यानचेंग वाइल्ड एनिमल वर्ल्ड नावाचे प्राणी संग्रहालय आहे. येथे काम करणाऱ्या एलवी मेंगमा आपल्या ऑफिसमध्ये बसून ऑनलाईन शॉपिंग करण्याच्या तयारीत होत्या. याचवेळी त्यांच्या लक्षात आले की, त्यांनी एका माकडाला जेवायला दिलेले नाही. त्यामुळे त्या शॉपिंगसोडून माकडासाठी जेवण आणायला गेल्या आणि आपला फोन तेथेच ठेवला. मात्र त्या परत येईपर्यंत माकडाने आपले काम पुर्ण केले होते.

मेंगमां परत आपल्या ऑफिसमध्ये आल्या तेव्हा त्यांच्या मोबाईलवर अनेक नॉटिफिकेशन आले होते. त्यांनी फोन बघितला त्यावेळी त्यात ‘Order Placed’ असे लिहिलेले होते. मेंगमां यांना काहीच लक्षात येत नव्हते. कारण त्यांनी फक्त वस्तू बघण्यास सुरूवात केली होती. मात्र त्या परत येईपर्यंत ऑर्डर झाली देखील होती.

https://youtu.be/rShvtdYOGko

असे कसे झाले हे तपासण्यासाठी मेंगमां यांनी सीसीटिव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये दिसले की, मेंगमां ऑफिसमधून बाहेर जाताच एक छोटे माकड आत येते व त्यांचा फोन उचलते. आणि मोबाईलशी खेळत असताना हेच माकड शॉपिंग देखील करते. मेगमां परत येत आहेत हे पाहून माकड लगेच फोन खाली ठेऊन गायब होते.

या घटनेनंतर देखील मेंगमां यांनी ऑर्डर कॅन्सल केली नाही. कारण त्यांनीच या वस्तू कार्टमध्ये टाकल्या होत्या व त्यांना त्याची गरज होती.

Leave a Comment