Video : हा उलटा धबधबा पाहून नेटकरी देखील झाले प्रभावित

कधीकधी निसर्ग स्वतःच्याच नियमांच्या विरोधात कार्य करत असतो. एका रेडिट युजरने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, निसर्ग किती विचित्र आहे व भौतिकशास्त्राच्या नियमांविरोधात कार्य करत आहे.

रेडिट युजरने एक धबधब्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आयर्लंडच्या क्लिफ्स ऑफ मोहर येथील या व्हिडीओ पाणी खालच्या दिशेने जाण्याऐवजी उलट्या दिशेने उडत आहे. खडकांना धडकणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे पाणी अशाप्रकारे वरच्या दिशेने उडत आहे.

Waterfall flowing back up the Cliffs of Moher (on the Doolin side) from very strong winds this weekend from ireland

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकरी देखील यावर भन्नाट कमेंट्स करत आहेत. एका युजरने कमेंट केली की, भौतिकशास्त्राच्या वर्गात शिकलेले वॉटर सायकलच्या हे एकदम उलटे आहे. तर एकाने लिहिले की, याला वॉटरफ्लाय म्हटले पाहिजे.

Leave a Comment