फेसबुकच्या या नव्या फिचरमुळे बंद होणार नोटिफिकेशनची डोकेदुखी


दिवसभरात आपल्या फेसबुक सतत विविध प्रकारचे नोटिफिकेशन येत असतात. यामागे फेसबुकचा अॅपवर आपल्या जवळच्या घडामोडी आणि मित्रांनी आपल्यासोबत कनेक्ट रहावे हा उद्देश असतो. पण या नोटिफिकेशन्समुळे अनेकदा युझर्स वैतागतात. त्यामुळेच आता Shortcut Bar Settings हे नवे फीचर फेसबुकने आणले आहे. या संदर्भातील वृत्त तंत्रज्ञानाशी संबंधित संकेतस्थळ असलेल्या टेकक्रंचने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, फेसबुक अॅपमध्ये नेव्हीगेशन बारमध्ये नव्या फीचरचा पर्याय करण्यात आला आहे.

नेव्हिगेशन बार कंट्रोल्स फेसबुककडून रोल आऊट केली जात आहेत. युझर्सना जेणेकरुन त्यांच्या आवडीच्या गोष्टींशी कनेक्ट राहता येईल आणि स्वतःला हवे तसे नोटिफिकेशन्सही नियंत्रित करता येतील, अशी माहिती फेसबुककडून टेकक्रंचला देण्यात आली. दरम्यान, फेसबुकचे नवे फीचर iOS वर दिसून आले आहे, पण अँड्रॉईड वापरकर्त्यांना यासाठी वाट पाहावी लागणार आहे.

युझर्स फेसबुकच्या या नव्या फीचरच्या माध्यमातून Watch Groups, Marketplace, Profile, Events, News, Friend Requests, Today In, Gaming and Dating यांसारखे टॅब्स हटवू किंवा नोटिफिकेशनही बंद करु शकतात. फेसबुकच्या नोटिफिकेशनमुळे वैतागलेल्या युझर्सना यामुळे दिलासा मिळणार आहे. फेसबुक अॅपच्या शॉर्टकट बारमधून जे टॅब तुम्हाला हटवायचे आहेत, त्या आयकॉनवर काही सेकंद प्रेस करावे लागेल. यानंतर Remove from shortcut bar आणि turn off notification dots हे दोन पर्याय दिसतील. तुम्ही याशिवाय सेटिंगमध्ये जाऊनही या फीचरचा वापर करु शकता. यासाठी फेसबुक अॅपच्या Settings & Privacy > Settings > Shortcuts bar हा मार्ग निवडावा लागेल.

Leave a Comment