शानदार फोटोग्राफीसाठी फ्यूजीफिल्मचा एक्स-ए7 मिररलेस कॅमेरा लाँच

जापानची टेक कंपनी फ्यूजीफिल्मने भारतात आपला सर्वात खास मिररलेस कॅमेरा एक्स-ए7 लाँच केला आहे. युजर्सला या कॅमेऱ्यात 24.24 मेगापिक्सल एपीएस-सी सेंसर कॅमेरा मिळेल. या कॅमेऱ्याची किंमत 59,999 रूपये आहे. याचबरोबर यासोबत फ्यूजीनॉन एक्ससी 15-45 एमएमची लेंस किट देण्यात येईल. हा कॅमेरा कॅमेल, डार्क सिल्वर, मिन्ट ग्रीन, नेव्ही ब्लू आणि सिल्वर रंगात मिळेल.

कंपनीने याआधी फ्यूजीफिल्म एक्स-ए7 ला सप्टेंबरमध्ये लाँच केले होते. अमेरिकेतील ग्राहकांना या कॅमेऱ्यासोबत फ्यूजीनॉन एक्ससी15-45 एफ 3.5- 5.6 ओआयएस पीझेड एमएम लेंस किट देण्यात आली होती. ट्रॅव्हल फोटोग्राफर्स आणि व्लॉगर्ससाठी हा शानदार कॅमेरा आहे. कारण यात जबरदस्त लेंससोबत अनेक फीचर्स आहेत.

(Source)

 

एक्स-ए7 कॅमेऱ्यात युजर्सला कॅमेऱ्यात स्नॅपशॉट्स क्लिक करण्यास मिळेल. याचबरोबर या डिव्हाईसमध्ये 3.5 इंच डिस्प्ले आणि 1,000 candelas देण्यात आले आहेत. या कॅमेऱ्याची खास गोष्ट म्हणजे यात युजर्सला यामध्ये वेगवेगळ्या एँगलला मॉनिटर करण्यास सपोर्ट मिळेल. त्यामुळे एका एँगलवर शानदार फोटो क्लिक करता येतील. याशिवाय यामध्ये पोट्रेट इन्हँसर मोड देण्यात आला आहे, जो सेल्फ पोट्रेट क्लालिटी चांगली बनवतो.

युजर्सला या मिरर लेस कॅमेऱ्यात 24.2 मेगापिक्सल एपीएस-सी सीमॉस सेंसर मिळेल. याशिवाय याचे सेंसर जुन्या मॉडेलच्या तुलनेत 8.5 पट मोठे आहे.

(Source)

या कॅमेऱ्यात आयएसओ रेंज 100-12,800 आहे, ज्याला वाढून 25,600 केले जाऊ शकते. यासोबत ग्राहकांना यात एक एसडी कार्ड स्लॉट मिळेल. यामध्ये मिनी एचडीएमआय पोर्ट, मायक्रो यूएसबी पोर्ट, इन-बिल्ट ब्लूटूश व्हर्जन 4.2, वाय-फाय 802 सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Leave a Comment