अजय देवगणच्या बहुप्रतिक्षीत ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’चे नव पोस्टर रिलीज


अभिनेता अजय देवगण आणि दिग्दर्शक ओम राऊत यांच्या आगामी हिंदवी स्वराज्याच्या लढ्यातील ‘सिंह’ नरवीर तानाजी मालुसरे यांचा पराक्रम सांगणारा ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरसोबत चित्रपटाचा ट्रेलर या महिन्याच्या 19 तारखेला रिलीज करण्यात येणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.


रिलीज करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये ‘स्वराज से बढकर क्या?’ असा प्रश्न विचारत करारी मुद्रेने पाहत उभा असलेला तानाजी दिसत आहे. अजयने यापूर्वी देखील ‘तलवारी इतकीच तीक्ष्ण बुद्धिमत्ता’ असे म्हणत चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले होते. या चित्रपटात अजय देवगणसोबतच अभिनेता सैफ अली खान महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. उदयभान राठोड यांची भूमिका सैफ साकारणार आहे. सैफच्या चित्रपटातील लूकचेही पोस्टर लाँच करण्यात आले आहे. सैफच्या भूमिकेची एक झलक या पोस्टरमध्ये पाहायला मिळत आहे. चित्रपटात मराठमोळा अभिनेता अजिंक्य देव हा सुद्धा झळकणार आहे. पण, चित्रपटात तो नेमकी कोणती भूमिका साकारणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

सुपरस्टार अजय देवगनसोबत आगामी ‘ तानाजी: द अनसंग वॉरियर’ मध्ये अभिनेता शरद केळकर दिसणार आहे. शरद म्हणतो अजय देवगन त्याला त्याच्या मोठ्या भावासारखा आहे. शरद अजयसोबत या चित्रपटाच्या निमित्ताने चौथ्यांदा काम करत आहे.

Leave a Comment