पत्नीला ऋतिक रोशन आवडत असल्याने केली हत्या, नंतर स्वतः केली आत्महत्या


आपली बॉलिवूड कलाकारांप्रति असलेली आवड किंवा प्रेम निर्माण होणे ही अत्यंत साधी गोष्ट आहे. पण दुसऱ्या व्यक्तीला एखाद्या कलाकारावरील प्रेम न आवडणारे ठरल्यास त्यावरुन वाद झाल्याचे आपण अनेकदा पाहिले असेल. अशाच पद्धतीचा एक किस्सा नुकताच अमेरिकेत घडला आहे. तर अभिनेता हृतिक रोशन याच्यावर एका विवाहित महिलेचा क्रश असल्याने या गोष्टीची तिच्या नवऱ्याला प्रचंड चीड येत असल्यामुळे बायकोची त्याने याच कारणावरुन हत्या करत स्वत: सुद्धा गळफास लावून आत्महत्या केली आहे.

लग्नाच्या सुरुवातीपासूनच भारतीय वंशाचे लग्न झालेले दिनेश्वर बुद्धीदात आणि डोनी डोजॉय यांच्यामध्ये वाद होत होते. पण हृतिक रोशनवर डोनी हिला क्रश असल्याच्या कारणामुळे त्याचा त्याला संताप यायचा असे त्यांच्या मित्रांनी स्पष्ट केले आहे. अत्याचारी व नियंत्रित म्हणून पती, दिनेश्वर बुद्धीद हा ओळखला जात होता. तसेच डोनी हिला ऑगस्ट महिन्यात इमारतीमध्येच त्याने कानशीलात लगावली होती. डोनी ही त्यानंतर घर सोडून निघून गेली होती. पण दिनेश्वर याने आत्महत्या करण्याच्या दोन दिवसांपूर्वीच आपली चुक न्यायालयात कबुल केली असल्याचे न्युयॉर्क पोस्ट मधून सांगण्यात आले आहे.

हॉवर्ड येथील बीचवर जाण्यापूर्वी दिनेश्वर याने शुक्रवारी बायकोची क्वीन्सच्या घरी हत्या केली. त्यानंतर बायकोची हत्या केल्यानंतर त्याने स्वत: ला झाडाला लटकवत आत्महत्या केली. रिपोर्टनुसार फ्लॉवर पॉट खाली त्याच्या घराची किल्ली ठेवण्यात आली होती. पण डोनी हिची नेमक्या कोणत्या कारणावरुन दिनेश्वर याने हत्या केली हे स्पष्ट झालेले नाही. पण त्याच्या मित्रांनी सांगितले की, डोनी हिला हृतिक रोशन आवडत असल्याने त्याला चीड येत असे. तर जेमीनी लॉन्च कराओके सिंगर माला रामधनी हिने असे सांगितले की, डोनी हिला हृतिक रोशन याची गाणी आणि चित्रपट फार आवडायचे. मात्र दिनेश्वरला या वागण्यामुळे तिचा राग येत असे. मात्र दिनेश्वर याचे डोनी हिच्यावर प्रेम असल्याचे ही त्याच्या मित्रांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment