नागा बंडखोर नेत्याच्या मुलाच्या रिसेप्शनमध्ये रायफल घेऊन काढलेले फोटो व्हायरल

नागालँडचे बंडखोर नेते बोहोतो किबा सध्या आपल्या मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शनमुळे चर्चेत आहेत. बंडखोर संघटना नॅशनल सोशलिस्ट काउंसिल ऑफ नागालँड-युनिफिकेशन (एनएससीएन-यू) चे नेते किबा यांच्य मुलाच्या लग्नाचे रिस्पेश्न शनिवारी दीमापूर येथे पार पडले. या रिसेप्शनवेळी त्यांच्या मुलगा व सुनेने हातात एके-56 आणि एम-16 असॉल्ट रायफल हातात घेऊन फोटो काढले.

कार्यक्रमात उपस्थित पाहुण्यांनी देखील शस्त्रांसोबत असा फोटो काढण्यास मनाई केली नाही. या रिसेप्शनचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे प्रकरण अशा वेळी समोर आले आहे, जेव्हा केंद्र सरकार आणि नागा समुहांमध्ये शांतता करारावर अंतिम चर्चा सुरू आहे.

नागालँडचे पोलिस प्रमुख टी जॉन लाँगकुमेर म्हणाले की, मी अद्याप तो फोटो बघितलेला नाही व याबाबत मला काहीही माहिती देखील नाही.

केंद्र सरकारसोबत शांती करार करण्यासाठी बनलेल्या संयुक्त कार्यकारी समितीचे एनएससीएन-यू देखील एक भाग आहे. या संघटनेचे निर्मिती 23 नोव्हेंबर 2007 ला नॅशनल सोशलिस्ट काउंसिल ऑफ नागालँड आणि म्यानमार नॅशनल सोशलिस्ट काउंसिल नागालँड कापलांग यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर झाली आहे. एनएससीएन-यू सात नागा बंडखोर संघटनांपैकी एक आहे.

Leave a Comment