‘गर्ल्स’ चित्रपटाचा बिनधास्त ट्रेलर रिलीज


तब्बल २० वर्षांपूर्वी मराठी सिनेसृष्टीत मुलींच्या आयुष्याचा मागोवा घेणारा बिनधास्त चित्रपट आला होता. त्यानंतर मुलींच्या भावविश्वावर केंद्रीत असा चित्रपट मराठीत आला नाही. मराठीत आता पुन्हा एकदा मुलींच्या भावविश्वावर अगदी बोल्ड आणि बिनधास्तपणे वावरणारा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गर्ल्स हा मुलींच्या आयुष्याला जवळून दर्शविणारा चित्रपटाच्या पोस्टरपासूनच चित्रपटाची चर्चा रंगल्यानंतर या चित्रपटाची गाणी आणि टीझरने सुद्धा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. नुकताच या चित्रपटाचा बिनधास्त आणि बोल्ड ट्रेलर रिलीद करण्यात आला आहे.

या ‘गर्ल्स’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आणि त्याला सुद्धा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसला. या वर्षातील गर्ल्स हा बहुप्रतीक्षित चित्रपट आहे. पहिल्या पोस्टरपासूनच गर्ल्स चित्रपटाबद्दलची रसिकांमध्ये असलेली उत्सुकता या ट्रेलरमुळे नक्की वाढली आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाच्या बिनधास्त ट्रेलरने तरुणाईचे लक्ष वेधून घेतले आहे. नवीन विचार, नातेसंबंध आणि मुख्य म्हणजे त्यांची होणारी घट्ट मैत्री या गोष्टीवर भाष्य करणारा हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करणारा आहे.

अंकिता लांडे, केतकी नारायण, अन्विता फलटणकर, देविका दफ्तारदार, पार्थ भालेराव, अतुल काळे, अमोल देशमुख, सुलभा आर्या, किशोरी अंबिये यांच्या व्यतिरिक्त अनेक कलाकार गर्ल्स चित्रपटात दिसणार आहेत. येत्या २९ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या आणि ‘एव्हरेस्ट एंटरटेनमेंट’, ‘कायरा कुमार क्रिएशन्स’ प्रस्तुत आणि ‘अ कायरा कुमार क्रिएशन्स प्रॉडक्शन’च्या अंतर्गत ‘गर्ल्स’ या चित्रपटाची निर्मिती नरेन कुमार यांनी केली आहे.

Leave a Comment