तुम्हाला ओळखणे कठिण होईल नक्की कपिल देव आणि रणवीर सिंह कोण ?


२५ जून १९८३ रोजी भारतीय संघाने लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला याच विजयगाथेवर आधारित ’83’ हा चित्रपट येणार आहे. या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका अभिनेता रणवीर सिंह साकारत आहे. या चित्रपटातील रणवीरचा नवीन लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे. झाला आहे. या फोटोचे वैशिष्ट्य म्हणजे रणवीरचा हा लूक पाहून तुम्हाला देखील यातील रणवीर आणि कपिल यांच्यातील फरक ओळखणे कठीण होईल.


आपल्या नव्या लूकचा फोटो रणवीरने ट्विटवर नुकताच शेअर केला आहे. तो यामध्ये कपिल देव यांच्या सारखा नटराज शॉट खेळताना दिसत आहे. त्याचा हा लूक आणि नटराज शॉट खेळण्याची पद्धत पाहून तो हुबेहूब कपिल देव यांच्याप्रमाणे भासत असल्यामुळे प्रत्यक्षात कपिल देव असल्याचाच भास होत आहे. रणवीरने हा फोटो शेअर करत नटराज शॉट. #RanveerAsKapil’ असे कॅप्शन दिले आहे.

दरम्यान, रणवीरच्या या फोटोवर अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच रणवीरच्या या पोस्टवर अभिनेता मयांग चॅग, अर्शद वारसी आणि कुणाल कोहली यांनीही कमेंट करत लूक आवडल्याचे सांगितले आहे. दिग्दर्शक कबीर खान ‘83 ’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट सांभाळत आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क, चिराग पाटील, साकीब सलीम, ताहिर भसीन, जतिन सरना, जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर, पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

Leave a Comment