जगातील धनकुबेरांच्या संपत्तीत होत आहे घट

मागील काही वर्षात जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत घट होत आहे. चीनमधील जवळपास 50 जण अब्जाधिशांच्या यादीतून बाहेर पडले आहेत. वर्ष 2018 मध्ये जगातील सर्वात श्रीमंत लोकांची संपत्ती कमी होण्याचे कारण शेअर बाजाराची अनिश्चित्ता आणि चीनच्या अर्थव्यवस्थेतील घसरण हे आहे. मागील वर्षी जगभरातील अब्जाधिशांची संपत्ती 388 अब्ज डॉलर कमी झाली आहे.

बिलेनअर इफेक्ट रिपोर्टनुसार, ज्या लोकांच्या संपत्तीमध्ये घट आली आहे त्यांच्याकडे एक अब्ज डॉलरची संपत्ती आहे. 10 वर्ष त्यांच्या संपत्तीमध्ये वाढ झाल्यानंतर 2017 त्या तुलनेत मागीलवर्षी 4.3 टक्के घट झाली. त्याच्या आधी मागील 5 वर्षांमध्ये त्यांची संपत्ती 34.5 टक्के वेगाने वाढत होती. याचे मोठे कारण जागतिक बाजारात शेअर बाजाराची निश्चितता मानले जात आहे.

मागील वर्षी अब्जाधीशांच्या संपत्ती झालेल्या घटाला अमेरिकेचा डॉलर मजबूत, व्यापारी वाद आणि वित्तीय बाजाराची अस्थिरता सांगण्यात येत आहे. असे असले तरी देखील या अब्जाधीशांचा व्यापार चांगला सुरू आहे.

अमेरिकेनंतर चीनमध्ये सर्वाधिक अब्जाधीश राहतात. मागील वर्षी अर्थव्यवस्था घसरल्यामुळे चीनच्या अब्जाधीशांवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यांच्या संपत्तीत 12.3 टक्के घट आली आहे. यामुळे 48 लोक अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर पडले आहेत. आता चीनमध्ये एक अब्ज डॉलरपेक्षा अधिक संपत्ती असणाऱ्यांची संख्या 325 आहे.

संपुर्ण आशियामध्ये अब्जाधीशांच्या संख्येत 7.4 टक्क्यांनी कमी येऊन ही संख्या 753 राहिली आहे. युरोप, मध्य पुर्व आणि आफ्रिकेच्या अब्जाधीशांच्या संपत्ती 6.8 टक्क्यांनी घट आली असून, 3.4 ट्रिलियन डॉलर एवढीच संपत्ती राहिली आहे.  केवळ अमेरिकेत अब्जाधीशांच्या संपत्तीत 0.1 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचे श्रेय अमेरिकेच्या टेक व्यावसायिकांना जाते.

रिपोर्टनुसार, अब्जाधीशांच्या यादीत महिलांची संख्या देखील वाढली आहे. मागील 5 वर्षात अब्जाधीशा महिलांच्या संख्येत 46 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2013 मध्ये महिला अब्जाधीशांची संख्या 213 होती, जी आता वाढून 233 झाली आहे.

Leave a Comment