पुष्करच्या २ हजार १५० महिलांनी घुमर नृत्य करुन मोडला जोधपूरचा विक्रम


पुष्कर – आंतरराष्ट्रीय पुष्कर मेळ्यात महिलांनी घुमर नृत्य करून नवा इतिहास रचला आहे. गुरुवारी राजस्थानी वेषातील २ हजार १५० महिलांनी मेळा मैदानात एकाचवेळी लोकनृत्य सादर करून घुमर नृत्याचा नवा विक्रम केला आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पुष्करच्या मरुभूमीत आयोजित या लोकनृत्याच्या विक्रमाची नोंद केली आहे.

या अनोख्या व यशस्वी लोकनृत्याच्या आयोजनासाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचा पुरस्कार देऊन जिल्हाधिकारी विश्वमोहन शर्मा यांना गौरव करण्यात आला. सुमारे एक महिन्यापासून ऐतिहासिक घुमर नृत्याची तयारी सुरू होती. याबाबत प्रशासनाकडून गोपनीयता बाळगण्यात आली होती. स्मिता भार्गव यांनी नृत्याची कोरियोग्राफी केली. त्यांनी व्हिडिओ पाठवून नृत्यात भाग घेणाऱ्या महिलांना स्टेप शिकवल्या.

जोधपूरचा विक्रम मोडला – पुष्करमध्ये २ हजार १५० महिलांनी घुमर नृत्य करुन जोधपूरचा विक्रम मोडला. याआधी १७५० महिलांनी जोधपूरमध्ये आयोजित घुमर नृत्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होती

Leave a Comment