कोळ्याच्या नव्या प्रजातीला संधोशकाने दिले सचिन तेंडूलकरचे नाव


दोन नव्या कोळी प्रजातींचा शोध गुजरातमधील पर्यावरणशास्र आणि संधोशन संस्थेतील एका कनिष्ठ संशोधकाने लावला आहे. त्यानुसार या दोन नव्या कोळी प्रजातींची इंडोमॅरेंगो आणि मॅरेंगो अशी नावे आहेत. पण संशोधकाने यामधील एका कोळी प्रजातीला क्रिकेट विश्वाचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडूलकरचे नाव दिले आहे. संशोधकांचे नाव ध्रुव प्रजापती असे असून कोळी वर्गीकरण प्रजातीवर तो पीएचडी करत आहे.

एका रशियन जर्नल अथ्रोपोडा सिलेक्टामध्ये प्रकाशित ध्रुव प्रजापती यांनी केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष करण्यात आले आहेत. सचिन तेंडुलकर असे नाव कोळीच्या दोन प्रजातीमधील मॅरेंगो या प्रजातीला दिले आहे. ही शोध लावलेली प्रजाती आशियामधीलच आहे. तर दुसऱ्या प्रजातीच्या कोळी इंडोमॅरेंगा याला छावारापटेरा असे नाव दिले आहे.

आपण ज्यामुळे प्रेरित होतो त्यांची नावे कोळीच्या प्रजातींना दिल्याचे प्रजापती यांनी स्पष्ट केले आहे. तर सचिन याचे नाव देण्यामागे मुख्य कारण म्हणजे सचिन प्रजाती यांच्या आवडीचा क्रिकेटपटू असल्याने ते नाव ठेवण्यात आले आहे. तर संत कुरैकोर एलिया छावरा यांच्यापासून प्रेरित होऊन दुसरे नाव हे ठेवण्यात आले आहे. जागतिक कोळी यादीमध्ये कोळी प्रजातींचा समावेश करण्यात आला आहे. तर जगभरात एकूण 48 हजार कोळी प्रजाती असल्याचे प्रजापती यांनी सांगितले आहे.

Leave a Comment