Video : डायपर घालून शानदार फटकेबाजी करणाऱ्या चिमुकल्याचे इंग्लडचे क्रिकेटपटू झाले फॅन

इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर मायकल वॉन यांनी एका लहान मुलाचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जवळपास 3-4 वर्षांचे लहान बाळ टी-शर्ट, डायपर आणि हातात ग्लब्स घालून शानदार क्रिकेटिंग शॉट्स मारत आहे. सोशल मीडियावर या छोट्या खेळाडूचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये दिसते की, लहान बाळ हातात ग्लब्स घालून प्रॅक्टिस करत आहे. समोरून एक व्यक्ती त्याला गोलंदाजी करून असून, हे बाळ शानदार फ्रंट फूट ड्रायव्हर मारत आहे. डायपर घालून क्रिकेट खेळणाऱ्या छोट्या खेळाडूच्या टेक्निकची सर्वच जण कौतूक करत आहेत.

आतापर्यंत 1 लाखांपेक्षा अधिक युजर्सनी हा व्हिडीओ बघितला असून, शेकडो युजर्सनी यावर कमेंट्स केल्या आहेत.

या बाळाचे क्रिकेटिंग शॉट्स पाहून नेटकरी देखील चांगलेच प्रभावित झाले. एका युजर्सने कमेंट्समध्ये लिहिले की, सचिन तेंडुलकर पुन्हा येत आहे, तर काहींनी त्याच्या स्टिव्ह स्मिथ दिसत असल्याचे म्हटले.

 

Leave a Comment