याला आहे मिरचीचे व्यसन, दररोज लागतात ३ किलो मिरच्या


तिखटाचे नाव काढताच काही लोकांच्या डोळ्यात पाणी येते. मात्र मध्य प्रदेशातील करनावद या गावात एक अशी व्यक्ती आहे ज्याला मिरची खाण्याचे व्यसन आहे. त्याला रोज ३ किलो मिरच्यांचा खुराक लागतो.

प्यारे मोहन असे या मिरचीखवैय्याचे नाव आहे. त्याचे वय ४० वर्षे असून त्याला तीन मुले आहेत. गेल्या सहा वर्षांत तो एकदाही आजारी पडलेला नाही आणि याचे श्रेय तो मिरची खाण्याच्या सवयीला देतो. त्याला सहा वर्षांपूर्वी मिरच्या खाण्याचा छंद लागला आणि आता तो मिरच्यांशिवाय काहीच खात नाही. मिरच्या खाल्ल्यानंतर कित्येक तास त्याला पाणी किंवा साखऱेची गरज पडत नाही.

मिरची हिरवी असो किंवा लाल भडक असो, मला ती गोडच लागते असे प्यारे मोहन म्हणतो. अगदी काळी मिरीही त्याला वर्ज्य नाही. त्याच्या या सवयीमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली असून लोक त्याला पाहण्यासाठी दूर-दूरवरून येतात. त्याला ‘चिली मॅन’असे नावही मिळाले आहे.

Leave a Comment