या देशांमध्ये मिळतो सर्वाधिक पगार


जागतिक बँकेच्या परिभाषेनुसार, तीन प्रकारच्या अर्थव्यवस्थेत संपूर्ण जगाला विभागले गेले असून अत्यल्प उत्पन्न असलेल्या वर्गात प्रति व्यक्तीचे सरासरी उत्पन्न हे $१०२५ किंवा त्यापेक्षाही कमी असतं. मध्यम उत्पन्न असलेल्या अर्थव्यवस्थेत व्यक्तीचे सरासरी उत्पन्न $१०२६ ते $४०३५ या दरम्यान असते. उच्च उत्पन्न असलेल्या अर्थव्यवस्थेतील व्यक्तीचे सरासरी उत्पन्न $ ४०३६ ते $१२४७५ या दरम्यान असते. तर सर्वाधिक उत्पन्न असलेल्या अर्थव्यवस्थेतील व्यक्तीचे सरासरी उत्पन्न हे $१२४७६ किंवा त्यापेक्षाही अधिक असते. भारतात प्रति व्यक्ती सरासरी उत्पन्न हे १५०० डॉलर प्रति वर्ष आहे म्हणून भारताला मध्यम उत्पन्न असलेल्या अर्थव्यवस्थेत गणले जाते. आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत की, जगातील सर्वाधिक उत्पन्न असलेल्या देशांमध्ये कुठल्या देशांचा समावेश आहे आणि सर्वाधिक पगारकुठल्या देशातील नागरिकांना मिळतो.

जागतिक अहवालानुसार संपूर्ण जगामध्ये सर्वाधिक उत्पन्न असलेल्या देशाची लोकसंख्या केवळ ५.४३ लाख एवढीच आहे. हा देश आहे युरोपीयन लक्जमबर्ग शहर. लक्जमबर्ग येथील एका व्यक्तीचे सरासरी उत्पन्न ६१५११ डॉलर म्हणजेच ४० लाख रुपये प्रति वर्ष आहे. या पगारातून ३७.७ टक्के टॅक्स कापला जातो. संपूर्ण युरोपात स्टील उपलब्ध करण्यासाठी लक्जमबर्ग प्रसिद्ध आहे. यासोबतच केमिकल, रबर, इंडस्ट्रियल मशीनरीही देण्यात येतात.

जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था अमेरिका आहे आणि हा जगातील सर्वात श्रीमंत देश आहे. या ठिकाणी एक अमेरिकी कामगार आठवड्याला सरासरी ४४ तास काम करतो. अमेरिकेत नागरिकांना आपल्या उत्पन्नाच्या ३१.६ टक्के टॅक्स द्यावा लागतो. जगात सर्वात जास्त सॅलरी देणा-यांच्या देशांच्या यादीत अमेरिकेचा दुसरा क्रमांक लागतो. या ठिकाणी प्रति व्यक्ती सरासरी पगार $ ५७१३८ म्हणजेच ३७.५८ लाख रुपये प्रति वर्ष आहे.

जगातील पर्यटकांना आपल्या निसर्गरम्य ठिकाणामुळे आपल्याकडे आकर्षित करणारा आणि स्वच्छ देश म्हणजे स्वित्झर्लंड. या ठिकाणी निर्माण होणारी औषधे, घड्याळ, रासायनिक पदार्थ आणि संगीत वाद्य यासारख्या वस्तूंना संपूर्ण जगभरात मागणी आहे. या देशातील नागरिकांचे प्रति व्यक्ती उत्पन्न ३७.१० लाख रुपये प्रति वर्ष आहे.

युनायटेड किंगडममधील आयर्लंड हा एक कृषी केंद्र आहे. या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न हे $५३२८६ म्हणजेच ३४.६४ लाख रुपये आहे. नॉर्वे हा एक असा देश आहे जो प्राकृतिक रिसोर्समध्ये समृद्ध आहे. नॉर्वेत तेल, जंगल आणि इतर प्राकृतिक गोष्टींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या ठिकाणी नागरिकांना प्रत्येक आठवड्याला केवळ ३० तास काम करावे लागते म्हणून हे लोक मजा-मस्ती करण्यासाठी आपल्या आयुष्यातील अधिक वेळ देतात. या ठिकाणी प्रति व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न सरासरी $५१७१८ म्हणजेच ३३.६६ लाख रुपये आहे.

Leave a Comment