महिला ‘हे’ पाच कोर्स करून कमवू शकतात भरपूर पैसा


मुंबई : पुरुषांच्या कुबड्यांची महिलांना गरज असते हा समज आता इतिहास जमा झाला आहे. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून जगभरातील महिला काम करत आहेत. कित्येक क्षेत्रात तर महिला या पुरुषांच्या पुढे गेलेल्या दिसून येतात. शिक्षणात काही अशी क्षेत्र आहेत ज्यामध्ये डिग्री, डिप्लोमा किंवा सर्टिफिकेटचे शिक्षण घेऊन महिला सहजरित्या नोकरी मिळवू शकतात. कारण हे कोर्स महिलांसाठी सुरक्षित नोकरीचे आश्वासन देतात. महिलांसाठी असे पाच खास कोर्स आम्ही सांगणार आहोत ज्यातून महिला भरपूर पैसा कमवू शकतात.

१ – पाककला हे जर तुमचे आवडीचे क्षेत्र असेल तर एक तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. होम सायन्समधून पदवीधर झाल्यावर आपल्याला शहरातील कोणत्याही प्रतिष्ठीत हॉटेलमधून ट्रेनिंग लेवलवर शेफचे काम तुम्हाला सहज मिळू शकते. कारण हा कोर्स पूर्णपणे प्रॅक्टीकल कामावर अवलंबून असतो. शेफचे काम करुन तुम्ही भविष्यात लाखो कमावू शकता.

२ – महिलांची गरज नेहमीच फॅशन डिझाइनिंग क्षेत्राला राहीली आहे. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये कपडे आणि फॅशनची समज अधिक असते असे म्हणतात. महिला याच कारणाने वर्षानुवर्षे या क्षेत्रात पुरुषांपेक्षा अधिक वरचढ राहिल्या आहेत. स्टिचिंग आणि फॅशन करण्याची आवड तुम्हाला देखील आहे. तर ही एक संधी म्हणून तुम्ही नक्की पाहू शकता. नवीन फॅशनसोबत अनुभव आमि क्रिएटीव्ह स्वभाव तुम्हाला यशस्वी करु शकतो.

३ – याआधीही आणि भविष्यातही शिकविणे हे एक असे क्षेत्र आहे ज्याची मागणी कायम राहील. महिला शिक्षण क्षेत्रात आपले करिअर सहजरित्या बनवु शकतात. सुरक्षितता असण्यासोबत यामध्ये पैसाही बक्कळ कमविता येतो. तुम्हाला या क्षेत्रात येण्यासाठी एखाद्या विषयाची चांगली पक्कड असणे गरजेचे आहे. त्यामुळे बीएडमध्ये तुम्ही त्याविषयात मास्टरी करुन शिक्षक बनू शकता.

४ – महिलांची गरज एव्हीएशन क्षेत्रात जास्त आहे. एअर होस्टेस बनण्याचे प्रशिक्षण शहरातील विभिन्न एव्हीएशन संस्थामध्ये दिले जाते. महिलांना या संस्था प्रशिक्षीत करुन वेगवेगळ्या एअरलाईन्समध्ये कामाची संधी देतात. ट्रेनिंग दरम्यान महिलांचे सर्वसाधारण वागणे, भाषा आणि हावभाव याकडे विशेष लक्ष दिले जाते.

५ – महिलांना सध्याच्या युगात मीडिया क्षेत्रात नोकरीच्या संधी वाढल्या असून तुम्ही मॉडेलिंग आणि एंकरिंग करुन नाव आणि पैसा कमावू शकता. मॉडेलिंग आणि एंकरिंग करण्याचे शॉर्ट टर्म कोर्स कित्येक कॉलेज आणि संस्थांमध्ये उपलब्ध आहेत. येथे कोर्स करुन बाहेर कामाच्या अनेक संधी उपलब्ध होतात.

Leave a Comment