28 वर्षांपासून सुरक्षा देणाऱ्या ‘एसपीजी’ प्रमुखांचे सोनिया गांधींनी मानले आभार


नवी दिल्ली – एसपीजी सुरक्षा देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनाच देण्यात येते. गांधी कुटुंबीयांचाही त्यामध्ये समावेश होता. पण आता त्यांची एसपीजी सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली आहे. सोनिया गांधी यांनी यावर एसपीजी प्रमुख अरुण सिन्हा यांना पत्र लिहून आतापर्यंत सुरक्षा प्रदान केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

एसपीजी सुरक्षेचे मी माझ्या पूर्ण परिवाराकडून आभार व्यक्त करत आहे. एसपीजीने गेल्या 28 वर्षांपासून आमची सुरक्षा केली. आमची समर्पण, विवेकबुद्धीने काळजी घेतल्याबद्दल पूर्ण कुटुंबाच्यावतीने मी मनापासून कौतुक व कृतज्ञता व्यक्त करू इच्छिते, असे सोनिया गांधींनी पत्रामध्ये म्हटले आहे. त्याचबरोबर राहुल गांधी यांनी एसपीजीच्या सर्व अधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी माझ्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस काम केले. तुम्ही दिलेल समर्थन आणि आपुलकीसाठी आभार, असे टि्वट केले आहे.

Leave a Comment