अक्षयच्या पहिल्यावहिल्या म्यूझिक व्हिडिओमधील ‘फिलहाल’ गाणे रिलीज


नुकताच बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारचा पहिलावहिला म्यूझिक व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे. अभिनेत्री क्रिती सेनॉन हिची बहीण नुपुर हिनेदेखील त्याच्यासोबत या म्यूझिक व्हिडिओद्वारे अभिनयात पदार्पण केले आहे. या म्यूझिक व्हिडिओ अल्बमचे नाव ‘फिलहाल’ असे आहे. या गाण्याचा टीझर अक्षय कुमारने सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर या गाण्याची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.


हे गाणे पंजाबी गायक असलेल्या बी प्रँक याने गायले आहे. प्रेमीयुगुलांमध्ये कशाप्रकारे दुरावा येतो हे या गाण्यात दाखवण्यात आले आहे. जरी आपल्यासोबत आपले प्रेम नसेल, तरी त्या व्यक्तीसोबत घालवलेले क्षण नेहमी आपल्यासोबत असतात, अशा भावना या गाण्यात पाहायला मिळतात.

या गाण्याची लिंक शेअर करुन अक्षयने लिहिले आहे, की बराच वेळ सिनेसृष्टीत अभिनय केल्यानंतर आता म्यूझिक व्हिडिओतही पदार्पण करत आहे. हे फक्त यासाठीच की काही गोष्टी या समजावण्यापेक्षा समजुन घेतल्या जातात. सोशल मीडियावर या गाण्यावर चाहत्यांच्या भरभरुन प्रतिक्रिया मिळत आहेत. सोशल मीडियावर नुपुरच्या अभियाचीही प्रशंसा होत आहे.

Leave a Comment