सलमान खानने गायलेले ‘दबंग 3’चे पहिले गाणे रिलीज


बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला अभिनयासोबत गायनाची आवड असल्याची आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्याने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. सध्या त्याचा आगामी ‘दबंग 3’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. तो सोनाक्षी सिन्हा आणि सई मांजरेकर या दोन्ही अभिनेत्रींसोबत या चित्रपटात रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला आहे. नुकतेच त्याच्या आवाजातील पहिले गाणे रिलीज करण्यात आले आहे.

1999 साली आलेल्या ‘हॅलो ब्रदर’ या चित्रपटात सलमान खानने त्याचे पहिले गाणे गायले होते. त्याने त्यानंतर ‘किक’, ‘हिरो’ आणि ‘नोटबुक’ यांसारख्या चित्रपटात गाणी गायली आहेत. त्याच्या आवाजाची जादु ‘दबंग 3’च्या पहिल्या गाण्यातही पाहायला मिळत आहे. त्याची आणि सोनाक्षीची रोमॅन्टिक केमेस्ट्री या गाण्यात दिसून येते. तो चुलबुल पांडे ही भूमिका या चित्रपटात साकारत आहे. तर, सोनाक्षी त्याच्या पत्नीच्या रज्जोच्या भूमिकेत दिसणार आहे.

सलमान खानसोबतच या गाण्याला पायल देव या गायिकेचा आवाज लाभला आहे. तर, या गाण्याला साजिद-वाजिद यांच्या जोडीने संगीतबद्ध केले आहे. या जोडीने आजवर सलमानच्या चित्रपटांसाठी सुपरहिट संगीताची निर्मिती केली आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रभू देवा यांनी सांभाळली आहे. हा चित्रपट 20 डिसेंबरला रिलीज होणार आहे.

Leave a Comment